आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मंदिरे खुली करण्याची भाजपची मागणी:बार किंवा मॉलपेक्षा कमी गर्दी मंदिरांमध्ये असते, मग सोशल डिस्टन्स ठेवून मंदिरे सुरु करण्यास काय हरकत? देवेंद्र फडणवीसांचा सवाल

पंढरपूर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • अनेक गरीब लोकांची उपजीविका मंदिरांवर अवलंबून आहे

जेवढी गर्दी बारमध्ये होते, त्यापेक्षा कमी गर्दी मंदिरांमध्ये असते. सोशल डिस्टन्स ठेवून मंदिरे उघडण्यास काय हरकत आहे असा सवाल आज माजी मुख्यमंत्री आणि विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीसांनी केला आहे. शेकापचे नेते आणि माजी दिवंगत आमदार गणपतराव देशमुख यांच्या कुटुंबांची सांत्वनपर भेट घेण्यासाठी आणि सुधारकरपंत परिचारक यांच्या प्रथम स्मृतीदिनानिमित्त फडणवीस पंढरपुरात आले होते.

राज्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव थोडा कमी झाल्यानंतर राज्य सरकारने निर्बंध शिथिल केले आहेत. यानंतर दुकाने, मॉल, हॉटेल आदींसाठी रात्री 10 वाजेपर्यंत परवानगी देण्यात आली आहे. मात्र, राज्यातील मंदिरे आणि धार्मिक स्थळे ही पुढील आदेशापर्यंत बंदच राहणार आहेत. यावरुन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. तसेच मंदिरे आणि धार्मिक स्थळे खुली करण्याची मागणी केली आहे.

देवेंद्र फडणवीस म्हणाले की, राज्यातील दारुची दुकाने उघडी ठेवता. मात्र, मंदिरांना बंद ठेवता हे चूक आहे. जेवढी गर्दी बार किंवा मॉलमध्ये होते त्यापेक्षा कमी गर्दी मंदिरांमध्ये असते. सोशल डिस्टन्स ठेवून मंदिरे खुली करण्यास काय हरकत आहे? असा सवाल फडणवीसांनी केला आहे. पुढे बोलताना फडणवीस म्हणाले की, अनेक गरीब लोकांची उपजीविका मंदिरांवर अवलंबून आहे. हारवाल्यापासून ते पुजारी अशा अनेकांची उपजीविका मंदिरांवर अवलंबून आहे. किमना त्यांच्यासाठी तरी मंदिरे खुली करण्यात यावीत. अशी मागणी फडणवीसांनी सरकारकडे केली आहे.

बातम्या आणखी आहेत...