आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आशिष शेलारांची फटकेबाजी:शरद पवारांनीही पाळला होता संयम; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्र आणि देशाची माफी मागावी

2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या अटकेवरून भाजप नेते आशिष शेलार यांनी पत्रकार परिषद घेऊन शिवसेनेवर जोरदार निशाना साधला आहे.

आशिष शेलार यांनी थेट शरद पवारांसोबत घडलेल्या घटनेचा दाखला देत, पवारांना कानशिलात लावलेले देशाने पाहिले. पवारांनी त्यावेळी संयम पाळून त्या व्यक्तीला माफ केले, मात्र संयमी माणसासोबत राहूनही शिवसेनेला ते कळत नाही, अशी टीका शेलार यांनी केली आहे.

यामुळे पवारांचीही नाराजी..

अनिल परब गृहखात्यात हस्तक्षेप करत असल्याबद्दल शरद पवार यांनी एकदा नाराजी व्यक्त केली होती. मंगळवारी देखील परब यांनी हस्तक्षेप केल्याचा प्रकार समोर आला आहे. आमच्या माहितीनुसार, अटकपूर्व जामीन अर्ज चार ते साडेचारच्या दरम्यान निकाली निघाला. त्याआधीच मंत्री अनिल परब सांगत आहेत की, जामीन नाकारण्यात येणार आहे. याचा अर्थ दलालांमार्फत किंवा या प्रक्रियेमध्ये हस्तेक्षेप करण्याचा मंत्रिमहोदयांनी प्रयत्न केला असावा, अशी शक्यता आहे. मुंबई उच्च न्यायालयाची बदानामी आणि अपमान करण्याचा हा प्रयत्न आहे, असे शेलार म्हणाले.

चौकशीची मागणी
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या अटक प्रकरणामध्ये आयपीएस अधिकारी केंद्राला जबाबदार असतात. राणे केंद्रीय मंत्री आहेत. राज्याचा एक मंत्री आयपीएस अधिकाऱ्यांना केंद्रीय मंत्र्याच्या अटकेसाठी फोन करत होता. कोर्टात त्यांचा जामीन अर्ज फेटाळण्यात येईल, असा निवाडा ते घोषित करत होते. हे सगळे प्रकरण संशयास्पद असून याची सीबीआय चौकशी करावी, अशी मागणी शेलार यांनी केली.

उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्राची आणि देशाची माफी मागावी
शिवसेनेला नारायण राणे यांच्या वक्तव्यावर राग नसून मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या स्वातंत्र्यदिनाचे अज्ञान उघड झाले त्याचा थयथयाट आहे. 15 ऑगस्ट रोजी महाराष्ट्राला संबोधित करताना मुख्यमंत्री हा हिरक महोत्सव आहे की, अमृत महोत्सव याबाबत अज्ञान जाहीर करत आहेत. की जाणुनबुजून केले जातेय. की अजातेपणे झाले? याबाबत मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्राची आणि देशाची माफी मागावी, असेही शेलार म्हणाले.

बातम्या आणखी आहेत...