आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

इशारा:सरकारच्या मानगुटीवर बसल्याशिवाय जनतेचे प्रश्न सुटणार नाहीत : चंद्रकांत पाटील

सोलापूरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • अर्थसंकल्पीय अधिवेशनात मुंडे प्रकरणावर सरकारला घेरणार, पाटलांचा इशारा

रोज एक नवीन विषय काढून मूळ मुद्द्याला बगल देणे, विषयच गाडून टाकणे असे प्रकार राज्य सरकार करत आहे. आता मानगुटीवर बसल्याशिवाय जनतेचे प्रश्न सुटणार नाहीत. येत्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात शेतकरी कर्जमाफी, अतिवृष्टीची भरपाई आणि धनंजय मुंडे या विषयांवर शासनाला धारेवर धरणार असल्याची माहिती भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सोलापूर येथे शुक्रवारी दिली.

काेराेनाच्या नावाखाली राज्याने चित्रविचित्र निर्णय घेतले. लाॅकडाऊन कालावधीत आंदाेलन करण्यावर मर्यादा हाेत्या. परंतु आता आम्ही गप्प बसणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला. ते म्हणाले, २ लाखांपर्यंत कर्जमाफी दिली. त्याचे निम्मे पैसे अद्यापही आलेले नाहीत. नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार रुपयांचे प्राेत्साहन अनुदान देण्याचे ठरले. त्याचाही पत्ता नाही. २ लाखांच्या वरील रकमेसाठी एकरकमी परतफेड याेजना दिली. तीही फसवी निघाली. पीक विमा कंपन्यांनी याेजना नाकारली. त्यांच्याशी चर्चा करण्यासाठी सरकारचा पुढाकार नाही. मराठा आरक्षणाच्या तर चिंध्याच झाल्या. आेबीसी आणि मराठ्यांमध्ये संघर्ष निर्माण केला.

आमदार विजय देशमुख, आमदार सुभाष देशमुख, पक्षाचे शहराध्यक्ष विक्रम देशमुख असे तिन्ही देशमुख त्यांच्यासाेबत हाेते.

२६ जानेवारीला हिंसाचार.. त्याचे समर्थन कसे करता?

२६ जानेवारीला दिल्लीत झालेल्या हिंसाचाराचा आम्ही निषेध करताे. धनंजय मुंडे स्वत: करुणा शर्मासाेबत संबंध असल्याचे सांगतात. तिच्यापासून मुले झाली, त्यांना माझे नाव दिल्याचेही म्हणतातय त्यांना ‘क्लीन चिट’ कशी देता, असा प्रश्नही केला. रेणू शर्मा हा आमचा विषयच नाही. स्वत: मुंडे जे बाेलतात ते निवडणूक आयाेगाकडे दिलेल्या प्रतिज्ञापत्रात हवे हाेते, हाच आमचा मुद्दा आहे. त्यावर सरकारने स्पष्टीकरण द्यावे, हीच मागणी आहे.