आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चंद्रशेखर बावनकुळेंची टीका:जावेद अख्तर यांनी एक महिना अफगाणिस्तानात जाऊन अतिरेक्यांसोबत राहून यावं

19 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

प्रसिद्ध गीतकार, लेखक जावेद अख्तर यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची तुलना तालिबानशी केली असून, त्याचे समर्थन करणाऱ्यांनी आत्मपरीक्षण केले पाहिजे, असे म्हटले होते. त्यांच्या वक्तव्याचा निषेध करत जावेद अख्तर यांनी किमान एक महिना अफगाणिस्तानात जाऊन तालिबान्यांसोबत रहावे, अशी टीका भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे.

जावेद अख्तर यांच्याबद्दल आदर होते. पण, त्यांनी आरएसएस, बजरंग दल, विश्व हिंदू परिषद या संघटनांवर केलेल्या वक्तव्याचा निषेध बावनकुळे यांनी केला आहे. ते म्हणाले, अख्तर यांना संघाचा इतिहास माहिती नाही. संघाने दिन दुबळ्यांसाठी काम केले आहे. देशाच्या हितासाठी समाजातील शेवटच्या दिनदुबळ्या घटकांच्या हितासाठी कल्याणासाठी काम करणारी संघटना आहे. देश हितासाठी जे मन्युष्यबळ लागते यासाठी संस्कारमय व्यक्ती तयार करण्याचे करणारे विद्यापीठ म्हणजे संघ आहे.वादग्रस्त शब्द परत घ्यावेदेशात एखादा लिखाण करणाऱ्या व्यक्तीने वक्तव्य करावे आणि ते लोकांनी मान्य करावे, असे होणार नाही. एकतर जावेद अख्तर यांनी ते वक्तव्य परत घ्यावे, अन्यथा त्यांनी अफगाणिस्तानला एक महिना राहून यावे, अशा शब्दात चंद्रशेखर बावनकुळे यांनी टीका केली.

बातम्या आणखी आहेत...