आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महिला अधिकाऱ्याची सुसाईड नोट:‘पारनेरच्या तहसीलदार ज्योती देवरे यांची ऑडिओ क्लीप ऐकली.. अन् मन सुन्न झालं’, चित्रा वाघ यांनी व्यक्त केला संताप

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पारनेरच्या तहसीलदार ज्योती देवरे यांच्या एका ऑडिओ क्लिपमुळे राज्यात खळबळ उडाली आहे. पारनेरच्या लोकप्रतिनिधींच्या जाचाला कंटाळून आत्महत्या करण्याचा इशारा त्यांनी या क्लिपमध्ये दिला.

नुकत्याच आत्महत्या केलेल्या वनअधिकारी दीपाली चव्हाण यांना उद्देशून देवरे यांनी ऑडिओ पत्र लिहिले आहे. त्यात त्या म्हणतात, ‘मी लवकरच तुझ्यासोबत येत आहे’. तर महिला म्हणून प्रशासनात होणारा छळ. लोकप्रतिनिधी कसा त्रास देता आणि वरिष्ठ त्यांना कसे पाठिशी घालतात याचा उल्लेख त्यांनी केला आहे.

प्रकरावर भाजप नेत्या चित्रा वाघ यांची प्रतिक्रिया
या सर्व प्रकारावर भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी प्रतिक्रिया देत संताप व्यक्त केला आहे. त्या म्हणाल्या, पारनेरच्या तहसीलदार ज्योती देवरे यांची ऑडीयो क्लीप ऐकली..आणि मन सुन्न झालं. सत्तेतले हे बेलगाम घोडे… देवमाणूस म्हणून मिरवणाऱ्या पारनेरच्या या लोकप्रतिनीधीच्या नाकात वेसणं घालायचं काम महिला सशक्तीकरणाच्या बाता मारणाऱ्यांकडून होतं का तेचं आता पहायचयं आहे, असं चित्रा वाघ यांनी म्हटलं आहे.

मन परिवर्तन झाले..?

ही सुसाईड नोट व्हायरल झाल्यानंतर जिल्ह्यातील काही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी मध्यस्थी करत संबंधित महिला अधिकाऱ्यांची भेट घेतल्याचे समजते त्यातून त्यांचे मनपरिवर्तन झाल्याची ही माहिती आहे काही अघटीत होऊ नये यासाठी आता अधिकारी स्तरावर मोठ्या हालचाली सुरू झाल्या आहेत.

महिला अधिकाऱ्याची ऑडिओ क्लीप ऐकण्यासाठी क्लिक करा...अहमदनगरमध्ये खळबळ:महिला अधिकाऱ्याची सुसाइड ऑडिओ नोट चर्चेत; म्हणाल्या लोकप्रतिनिधी, कार्यकर्ते झुंडीने धावून येतात; मदती ऐवजी वरिष्ठ मारेकरीच पोहोचवितात