आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

राठोडांवर हल्लाबोल:'स्वतः शेण खाऊन समाजाला वेठीस धरणे योग्य नाही'; भाजप नेत्या चित्रा वाघ यांचा घणाघात

मुंबई11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • 'संजय राठोड हा पूजा चव्हाणांचा हत्यारा आहे'

पुजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात नाव आल्यानंतर राज्याचे वनमंत्री संजय राऊत 15 दिवसानंतर माध्यमांसमोर आले. पोहरादेवी येथे दर्शनासाठी आले असता पत्रकार परिषद घेऊन त्यांनी आपली बाजू मांडली. यावेळी त्यांनी त्यांच्यावर लावण्यात आलेल्या सर्व आरोपांना फेटाळून लावले. यानंतर भाजपकडून राठोडांचा चांगलाच समाचार घेण्यात आला आहे. 'स्वत: शेण खाऊन समाजाला वेठीस धरण्याचा नवा ट्रेण्ड सध्या राजकारणात आलाय. पण, संजय राठोड पूजा चव्हाणचा हत्यारा आहे, त्याच्या मुसक्या आवळायलाच हव्यात', असा घणाघात भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी केला आहे.

पूजा वादानंतर प्रथमच मीडियासमोर:'मला आणि माझ्या कुटुंबीयांना उद्ध्वस्त करणारे राजकारण आहे'; 15 दिवसानंतर संजय राठोड यांनी 'त्या' प्रकरणावर सोडले मौन

संजय राठोड यांच्या पत्रकार परिषदेनंतर भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी माध्यमांसमोर येऊन राठोड यांच्यावर टीकास्त्र सोडले. त्या म्हणाल्या की, 'संजय राठोड निर्दोष आहे सांगण्याचा केविलवाणा प्रयत्न करत आहेत. मला बंजारा समाजाबद्दल आदर आहे. पण, आपण शेण खायचे आणि समाजाला वेठीस धरायचे, हे योग्य नाही.'

'संजय राठोड हा पूजा चव्हाणचा हत्यारा आहे. राजकारणासाठी समाजाला वेठीस धरण्याचा नवा ट्रेंड राजकारणात येत आहे. राठोडांनी केलेल्या पापाची कबुली करण्यासाठी ते बंजारा समाजाच्या काशीमध्ये गेले. समाजाला एकत्रित करुन घोषणाबाजी केली. संजय राठोडांचा शहाणपणा गेले पंधरा दिवस कुठे होता. बलात्काऱ्यांना वाचवण्यासाठी सगळ्या मंत्र्यांमध्ये चढाओढ सुरु आहे. सरकारने संजय राठोडांच्या मुसक्या आवळायला हव्या', असे चित्रा वाघ म्हणाल्या.

बातम्या आणखी आहेत...