आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

फडणवीसांचा हल्लाबोल:'सचिन वाझेंचे सर्व मालक चिंतेत की ते NIA ला काय सांगतील'- देवेंद्र फडणवीस

नागपूरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • फोन टॅपिंगचा रिपोर्ट केंद्रीय गृहमंत्रालयाला सादर

राज्यात सचिन वाझे प्रकरणावरुन सुरू असलेले आरोप-प्रत्यारोपाचे सत्र थांबायचे नाव घेत नाहीये. माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी परत एकदा या मुद्द्यावरून सत्ताधाऱ्यांवर टीकास्त्र सोडले आहे. 'सचिन वाझेंचे सर्व मालक याच चिंतेत आहेत की तो NIAला नेमके काय सांगेल,' असा हल्लाबोल फडणवीसांनी केला आहे.

नागपुरात मीडियाशी संवाद साधताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, 'सचिन वाझेचे बोलविते धनी चिंतेत आहेत की, एनआयएच्या चौकशीत काय सांगेल. नवाब मलिक आणि त्यांचे सहकारी घाबरले आहेत. वाझे काय बोलणार याची त्यांना भीती वाटत आहे. मी केवळ फोन टॅपिंग प्रकरणाचे दोन पाने दिली होती. मलिक यांनी अख्खा अहवाल देऊन अहवाल फोडला, असे फडणवीस म्हणाले.

अहवालातून अनेकांचे बिंग फुटणार
फडणवीस पुढे म्हणाले की, फोन टॅपिंग प्रकरणाचा अहवाल केंद्रीय गृहमंत्रालयाला सादर झाला आहे. त्यातून अनेकांचे बिंग फुटणार आहे. महाराष्ट्र पोलिस दलाची बदनामी करण्याचे काम कुणी केले, वाझे सारख्या निलंबित अधिकाऱ्याला सेवेत घेऊन त्याच्याकडे महत्त्वाच्या केसेस देण्यात आल्या. वाझे सारख्यांना सेवेत घेऊन सिंडिकेट राज चालवण्यात आले, असेही फडणवीस म्हणाले.

सीसीटीव्ही फुटेज मेन सर्व्हरला

फडणवीस म्हणाले की, पोलिसांचे सीसीटीव्ही कुणी गायब केले तरी बॅकअपमध्ये सर्व फुटेज सर्व्हरला आहेत. पोलिसांचे फुटेज गायब होऊ शकणार नाही, तशी व्यवस्था मी गृहमंत्री असताना केली होती. त्यामुळे त्याचे पुरावे मिटणार नाहीत, असंही ते म्हणाले.

सचिन सावंतांची खिल्ली

यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेस नेते सचिन सावंत यांच्या आरोपांना प्रत्युत्तर दिले. ते म्हणाले की, सचिन सावंतांना मी काय उत्तर देणार. त्यांना काही समजतं तरी का? त्यांना उत्तर द्यायला आमचे राम कदम आहेत. या अशांना मी थोडीच उत्तर देणार? असा टोला फडणवीसांनी लगावला.

बातम्या आणखी आहेत...