आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महाराष्ट्र भापजची दिल्लीवारी:देवेंद्र फडणवीस घेणार गृहमंत्री अमित शहा यांची भेट, राज्यातील अनेक नेते दिल्लीत दाखल

नवी दिल्ली4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • प्रदेशाध्यक्ष बदलणार नाही - देवेंद्र फडणवीस

राज्यातील भाजपचे प्रमुख नेते गेल्या काही दिवसांपासून दिल्ली दौऱ्यावर आहेत. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे शनिवारीपासून दिल्लीत असून त्यांच्या भेटीगाठी सुरु आहेत. तर दुसरीकडे खासदार रावसाहेब दानवे यांच्या दिल्लीतील निवासस्थानी भाजप नेत्यांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.

सदरील बैठकीमध्ये मराठा आरक्षण आणि इतर राजकीय मुद्यांवर चर्चा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. याच पार्श्वभूमीवर राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस दिल्लीत दाखल झाले आहेत. दरम्यान, ते आज केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेणार आहेत. दरम्यान, बैठकीकडे सर्वच राजकीय तज्ञांचे लक्ष लागलले आहे.

प्रदेशाध्यक्ष बदलावर काय म्हणाले पाटील
सध्यातरी प्रदेशाध्यक्ष बदलाचा विचार नसून आमच्या पक्षात तशी चर्चादेखील नाही. दर तीन वर्षांनी आमच्या पक्षात मोठे फेरबदल होतात. यामध्ये अगदी ग्रासरुटपासून राष्ट्रीय अध्यक्षापर्यंत बदल केला जातो. भाजप हा सर्वसामान्यांचा पक्ष असून यामध्ये सर्वांना संधी दिली जाते. त्यामुळे मी माझे तीन वर्षाचा कार्यकाळ पूर्ण करेल असा विश्वास पाटील यांनी व्यक्त केला होता.

प्रदेशाध्यक्ष बदलणार नाही - देवेंद्र फडणवीस
भाजप प्रदेशाध्यक्ष बदलाची चर्चा प्रसारमाध्यमांमध्ये सुरू झाली आहे. मात्र भाजप प्रदेशाध्यक्षपदाचा कालावधी तीन वर्षांचा असून चंद्रकांत पाटील यांची मुदत पुढील वर्षी जुलैपर्यंत आहे. त्यामुळे प्रदेशाध्यक्ष बदलण्याची शक्यता कमीच आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही शनिवारी पुण्यात प्रदेशाध्यक्ष बदलणार नाही असे स्पष्ट केले आहे.

बातम्या आणखी आहेत...