आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मराठा आरक्षण:मराठा समाजाच्या हिताचा ठाकरे सरकारकडून खून; भाजप नेते, माजी मंत्री आशिष शेलार यांची टीका

बीड16 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • पदवीच्या परीक्षा आणि बारावीच्या परीक्षांमध्ये फरक असतो

ज्या पद्धतीने कोल्ड ब्लडेड खून करणाऱ्यांची पूर्वतयारी व पूर्ण तयारी दिसत नाही. आरोपीचा भोळाभाबडा चेहरा समोर असला तरी दिसत नाही. तशाच प्रकारे काँग्रेस, राष्ट्रवादी आणि आता शिवसेनेने मराठा समाजाच्या हिताचा कोल्ड ब्लडेड खून केला, असा गंभीर आरोप भाजप नेते आमदार अॅड.आशिष शेलार यांनी बीड येथे पत्रकार परिषदेत केला. या वेळी भाजप आमदार अॅड. लक्ष्मण पवार, आ. सुरेश धस, जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांची उपस्थिती होती. आशिष शेलार म्हणाले, वेगवेगळ्या आयोगाने मराठा समाजाला आरक्षण नाकारणाऱ्या शिफारशी केल्या त्या शिफारशी तत्कालीन काँग्रेस, राष्ट्रवादी सरकारने नाकारल्या नाहीत. त्यानंतर राणे समिती आली.

खरे तर आयोगाची गरज होती पण समिती नेमली. अशा प्रकारे एक-एक करत मराठा समाजाच्या हिताचा खून करण्याचे काम तत्कालीन आणि आजच्या सरकारमधील पक्षांनी केले आहे. आज हेच लोक भारतीय जनता पक्षाला शिकवण्याचे काम करीत आहेत. त्यांनी आम्हाला शिकवण्याची अजिबात गरज नाही. त्यांनी नाकाने कांदे सोलू नयेत. मराठा समाजाला न्याय कसा देता येईल, हे पाहावे व समाजाच्या हिताची भूमिका घ्या, अशा शब्दांत त्यांनी ठाकरे सरकारला ठणकावले. मराठा समाजाला संपूर्ण आरक्षण हवे आहे. त्यासाठी पक्षाचा झेंडा बाजूला ठेवून साथ देत आहे.

मराठा समाजाला ३ हजार कोटींचे पॅकेज द्यावे, ओबीसींच्या सवलती लागू कराव्यात, अन्य कोणत्याही समाजाच्या आरक्षणाला नख लावू नका, अशा मागण्या त्यांनी या वेळी केल्या. ईडब्ल्यूएसमध्ये मराठा समाजाला आरक्षण ठाकरे सरकारने दिले. त्यात तुमचे कर्तृत्व काय? मराठा मोर्चाची खिल्ली उडवणाऱ्या शिवसेनेची, छत्रपतींंच्या वंशजाकडे पुरावे मागण्याची भावनाशून्यता दिसलीच होती, आता कर्तृत्वशून्यतापण दिसली, असे शेलार म्हणाले.

खासदार संजय राऊत यांचे निमंत्रण आम्ही स्वीकारले
देवेंद्र फडणवीस यांच्या पवार, खडसे भेटीवर सेना नेते संजय राऊत यांनी फडणवीस मातोश्रीवरही येतील असे सांगितले. यावर बोलताना हे मातोश्रीचे निमंत्रण आहे असे समजून आम्ही ते स्वीकारले आहे, असे शेलार म्हणाले.

पदवीच्या परीक्षा आणि बारावीच्या परीक्षांमध्ये फरक असतो
पदवीच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा रद्द करा, अशी मागणी युवा सेेनेचे आदित्य ठाकरेंनी केली होती. यावर भाजपने खिल्ली उडवली होती. आता मोदींनी बारावीची परीक्षा रद्द केली यावर विचारले असता सेनेचा पदवीधरांशी संबंध नाही. बारावीच्या परीक्षा रद्द करणे आणि पदवीच्या अंतिम वर्षाच्या रद्द करणे यात फरक असतो, असे शेलार म्हणाले.

बातम्या आणखी आहेत...