आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आरोप-प्रत्यारोप:चाटूगिरीमुळे बावचळलेले राऊत भोकं पडलेल्या फुग्याला एवढं का घाबरतायेत? गोपीचंद पडळकरांची संजय राऊतांवर सकडकून टीका

2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

सामनाच्या अग्रलेखावरुन शिवसेना नेते संजय राऊत यांच्यावर भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी जोरदार टीका केली आहे. आपल्या हुजरेगिरीमुळे बावचळलेले संजय राऊत आता भोक पडलेल्या फुग्याला एवढे का घाबरत आहेत, असा सवाल करत त्यांनी असंतर नाही की राणे साहेबांचा फुगा तुमच्याविषयीच्या गुपीतांनी भरलेला आहे. तो फुटला तर तुमच्या तिन्ही धन्यांचा तुमच्यावरचा विश्वास उडून जाईल. अशी टीका गोपीचंद पडळकरांनी केली आहे.

तसेच यावेळी त्यांनी नारायण राणेंवरील सुडाची कारवाई म्हणजे कायद्याची कारवाई असे संबोधता मग पोलिसांना त्यांच्या आई बहिणीवरून अत्यंत घाणरेड्या शब्दात शिव्या घालणाऱ्या वरूण देसाईला अटक का होत नाही? हेच का तुमचं महाराष्ट्र मॉडेल. असं सवालही त्यांनी यावेळी केला आहे.

‘तुमच्या हम करे सो’ कायद्याच्या फुग्याला देशाच्या कानाकोपऱ्यातून भोकं पडतील -
मला बाळासाहेबांच्या सामनाचे दैनिक ‘बाबरनामा’त रूपांतर करणाऱ्याला हेच विचारयेचे की त्यावेळेस यांची आस्मिता कुणाच्या पायापुढे लोटांगण घालते. माननीय संजय राऊत कमरेचं सोडून डोक्याला बांधून अग्रलेख लिहिण्याच्या विकृतीला बांध घाला. अन्यथा, ‘तुमच्या हम करे सो’ कायद्याच्या फुग्याला देशाच्या कानाकोपऱ्यातून भोकं पडतील,” अशी सडकून टीका गोपीचंद पडळकर यांची राऊतांवर केली.

बातम्या आणखी आहेत...