आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • BJP Leader In Maharashtra Is The Reason For Modi Government's Attempt To Create Obstacles In Mumbai Metro Work Sachin Sawant

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मेट्रो कारशेड:महाराष्ट्रातील भाजपच्या नेत्यामुळेच मोदी सरकारकडून अडथळे आणण्याचा प्रयत्न- सचिन सावंत

मुंबईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

महाराष्ट्रातील भाजप आणि केंद्रातील मोदी सरकारवर मेट्रोच्या कामात आडकाठी आणत असल्याचा आरोप काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी केला आहे. 'मुंबई मेट्रोचे काम सुरु असताना सॉल्ट डिपार्टमेंटला आठवण येणे हा योगायोग नाही. कांजूरमार्ग मेट्रो कारशेडची जमीन राज्य सरकारची आहे. महाराष्ट्र भाजपच्या नेत्यांमुळेच मोदी सरकारने आडकाठी आणण्याची भूमिका घेतली आहे', असा आरोप सचिन सावंत यांनी केला आहे.

सचिन सावंत म्हणाले की, 'भाजप म्हणजे महाराष्ट्राच्या विकासाच्या झारीतील कमळाचार्य आहे. या कमळाचार्याचा महाराष्ट्राच्या हितावर असलेला तिरका डोळा जनतेनेच फोडावा. महाविकासआघाडी सरकारच्या राज्य हिताच्या निर्णयांमध्ये भाजप आणि मोदी सरकार सातत्याने अडथळे आणण्याचा प्रयत्न करत आहे. कांजूरमार्गची मेट्रो कारशेडची जमीन ही राज्याची आहे. 1981 च्या आधीपासून जमिनीवर महाराष्ट्र शासनाचे नाव लागलेले आहे. 2015 मध्ये ही जमीन विभागीय आयुक्तांनी सॉल्ट डिपार्टमेंटला दिल्याचे कोणतेही पुरावे देता आलेले नाहीत. त्यामुळे त्यांचा दावा निकालात काढण्यात आला होता.'

'असे असताना 3 वर्षे या निर्णयाला सॉल्ट डिपार्टमेंटने न्यायालयात आव्हान दिले नाही. पण 3 वर्षांनंतर मेट्रो प्रकल्पाचे काम सुरू झाल्यानंतर लगेच सॉल्ट डिपार्टमेंटला आठवण झाली. हा योगायोग नाही. महाराष्ट्र भाजपच्या नेत्यांमुळेच मोदी सरकारने आडकाठी आणण्याची भूमिका घेतली आहे. त्यांच्या या कृतीचा जाहीर निषेध,' असेही सचिन सावंत म्हणाले.'

कांजूरमार्गच्या जागेवर केंद्राचा दावा धक्कादायक- सुप्रीया सुळे

कांजूरमार्गच्या जागेवर केंद्राने केलेला दावा धक्कादायक असून, ती जमीन महाराष्ट्र सरकारची असल्याची खासदार सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे. कुठल्याही कायद्याप्रमाणे ज्या राज्याची जमीन असते त्याचा त्यावर पहिला अधिकार असतो. केंद्र सरकार सातत्याने राज्याचे सगळे अधिकार काढून घेण्याचं काम करत आहे, असेही सुप्रिया सुळे म्हणाल्या.

काय आहे प्रकरण ?

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वी आरेमधील मेट्रो कारशेड कांजूरमार्गला हलवण्याचा निर्णय घेतला होता. राज्य सरकारने एकही रुपया न घेता ही जागा MMRDA ला दिल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले होते. मात्र, आता केंद्र सरकारने या जागेत मिठागार असल्याचे सांगत त्यावर आपला हक्क सांगितला आहे. या परिसरात आता केंद्र सरकारकडून ही जागा आपल्या मालकीचे असल्याचे बोर्ड तत्परतेने लावण्यात आले आहेत. ही जागा मिठागाराची असून त्यावर केंद्र सरकारचा हक्क असल्याचा मजूकर या फलकावर दिसत आहे.