आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आता आदित्य-तेजस ठाकरे टार्गेटवर:किरीट सोमय्या म्हणतात, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची घोटाळ्याची लंका कोणत्याही क्षणी जळू शकते

मुंबई22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

ठाकरे परिवार यांची बेनामी संपत्ती आता जप्त होत आहे, त्यामुळे त्याच्यातील अस्वस्थता दिसून येत आहे. कोणत्याही क्षणी उद्धव ठाकरे यांच्या घोटाळ्यांची लंका जळू शकते, असा थेट आरोप भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला आहे. आता आमचे पुढील टार्गेट आदित्य ठाकरे आणि तेजस ठाकरे असल्याचे सोमय्या यांनी स्पष्ट केले. त्यासाठी दिल्लीतील मोठ्या नेत्यासोबत मी चर्चा केली असल्याचा दावाही त्यांनी केला.

भाजप नेते किरीट सोमय्या यांनी थेट ठाकरे कुटुंबियांवर हल्ला चढवला आहे. त्यामुळे आगामी काळात शिवसेना विरुद्ध भाजप यांच्यातील संघर्ष तीव्र होण्याची शक्यता आहे. ठाकरे यांच्या घोटाळ्याची लंकेला हनुमान स्वतः येऊन आग लावतील अशी भीती मुख्यमंत्र्यांना वाटते आणि ती भीती वाटणे देखील स्वाभाविक असल्याचे सोमय्या म्हणाले.

आदित्य आणि तेजस ठाकरे टार्गेट
आदित्य ठाकरे आणि तेजस ठाकरे हे आमचे पुढील टार्गेट आहे. उद्धव ठाकरे यांचे साले यांच्या आणखी एका बेनामी संपत्तीची माहिती दिल्लीतील वरिष्ठांना दिली आहे. त्याचा पाठपुरावा करणार असल्याचे सोमय्या यांनी सांगितले. श्रीधर पटवर्धन यांच्या बेनामी कंपन्यांच्या माध्यमातून आदित्य आणि तेजस यांच्या कंपनीत पैसा आला असा आरोपही त्यांनी लावला. आदित्य आणि तेजस यांच्या कंपन्यांची चौकशी करणार असल्याचे ते म्हणाले. या संदर्भात आपण आजच दिल्लीतील मोठ्या नेत्यांशी चर्चा केली असल्याचे देखील सोमय्या यांनी सांगितले.

परवानगी नसेल तर लाऊड स्पीकर बंद झालेच पाहिजे
मंदीर असो वा मशिद ज्या ठिकाणी भोंग्यांना परवानगी नाही, ते बंद झालेच पाहिजे अशी भारतीय जनता पक्षाची भूमिका असल्याचे किरीट सोमय्या यांनी सांगितले. गणेशोत्सवात रात्री दहानंतर आवाजाचे डिसेबल मोजण्यासाठी मशीन घेऊन फिरतात, तसाच नियम सर्वांना लागू झाला पाहिजे, असे देखील सोमय्या म्हणाले.

उद्धव ठाकरे आणि संजय राऊत 'डरपोक'

उद्धव ठाकरे यांनी संजय राऊत मार्फत माझ्यावर भ्रष्ट्राचारचे आरोप केले. मात्र, त्यांच्याकडे एकही कागद नाही. जर हिम्मत असेल तर कागद घेऊन संजय राऊत यांना पोलिसांकडे पाठवा, असे आव्हान त्यांनी दिले. यामुळेच त्यांना आम्ही कायदेशीर कारवाईची नोटीस दिली असल्याचा दावा देखील त्यांनी केला. उद्धव ठाकरे आणि संजय राऊत 'डरपोक' आहेत, त्यामुळे त्यांनी माझ्यावर खोटे आरोप केले, असा आरोपही त्यांनी केला. 57 कोटींचा आरोप केला मात्र 57 पैशांचा कागदही दाखवू शकले नाही, असेही ते म्हणाले.

उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांना जागा दाखवून देऊ

माझ्यावर करण्यात आलेल्या आरोपाचा एक कागदही ते दाखवू शकले नाही. यामुळेच आम्ही त्यांना कायदेशीर नोटीस पाठवली आहे. नील आणि किरीट सोमय्या यांना जेलमध्ये टाकण्याचा त्यांचा डाव होता. त्यांच्या संपत्ती जप्त होत आहेत त्यामुळेच त्यांनी माझ्यावर आरोप केले असल्याचे सोमय्या म्हणाले. आता त्यांच्यावर मानहानीचा दावा दाखल करून त्यांना त्यांची जागा दाखवून देणार असल्याचे देखील त्यांनी स्पष्ट केले.

बातम्या आणखी आहेत...