आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भाजपचा मुख्यमंत्र्यांवर पलटवार:बाळासाहेब ठाकरे भोळे होते की, नाही माहित नाही, पण कपटी, कावेबाज आणि खंजीरखुपशे नक्कीच नव्हते

मुंबईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भारतीय जनता पक्षावर निशाणा साधत भाजपने शिवसेनेला धोका दिला असल्याचा आरोप केला आहे. यावरून भारतीय जनता पक्षाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर पलटवार केला आहे. मुख्यमंत्र्यांनी म्हटल्याप्रमाणे बाळासाहेब भोळे होते की, नाही माहित नाही. पण रोखठोक होते. कपटी, कावेबाज आणि खंजीरखुपशे नक्कीच नव्हते. असे म्हणत भाजपने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आरोपाला प्रत्त्युत्तर दिले आहे. भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून मुख्यमंत्री ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे.

आमदार अतुल भातखळकर म्हणाले की, 'बाळासाहेब ठाकरे भोळे होते, भाजपने त्यांना वेळोवेळी कसं फसवलंय हे मी डोळ्यांनी पाहिलंय इति उद्धव ठाकरे. हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे भोळे होते की नाही हे माहीत नाही पण रोखठोक होते. कपटी, कावेबाज आणि खंजीरखुपशे नक्कीच नव्हते.'

काय म्हणाले होते मुख्यमंत्री

विरोधी पक्षातील नेत्यांमध्ये मतभिन्नता मी समजू शकतो मात्र त्यांच्यातील सूडबुद्धी मला समजत नाही, ती वाढत चालली असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे. बाळासाहेब ठाकरे भोळे होते. त्यांना भाजपने कशा पद्धतीने फसवले हे मी डोळ्यांनी पाहिले असल्याचा आरोपही मुख्यमंत्र्यांनी केला आहे.

बातम्या आणखी आहेत...