आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापंढरपूरमध्ये शिवसैनिकांनी भाजपच्या माजी शहराध्यक्षाच्या तोंडाला काळे फासून मारहाण केल्याचा प्रकार समोर आला आहे. भाजप आमदार राम कदम यांनी याबाबत एक व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केला असून, सत्ताधारी शिवसेनेवर जोरदार टीकास्त्र सोडले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पंढरपूर शहराचे माजी भाजप अध्यक्ष शिरीष कटेकर यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली होती. त्यामुळे पंढरपूरमधील नाराज शिवसैनिकांनी शिरीष कटेकर यांना भर रस्त्यात तोंडाला काळे फासून विठ्ठल मंदिर परिसरात धिंड काढली. यावेळी शिवसैनिकांनी कटेकर यांना चोप देत त्यांच्या वक्तव्याचा जाहीर निषेध करण्यात आला. विशेष म्हणजे हा सर्व प्रकार पोलिसांसमोर घडला.
याबाबत राम कदम म्हणाले की, 'पंढरपूरमध्ये शिवसेनेच्या कार्यकर्त्यांचा पोलिसांसमोर कायदा हातात घेऊन नंगानाच ? राज्यात सत्ता आहे याचा इतका दुरुपयोग. सैनिकाच्या घरात घुसून त्याला मारण्यापासून पंढरपूरच्या रस्त्यावर खुद्द पोलिसांसमोर कायदा हातात घेण्यापर्यंत शिवसेना कार्यकर्त्यांची मजल जाते', अशा शब्दांत राम कदम यांनी संताप व्यक्त केला. याशिवाय, 'हे सगळं ठरवून ? निद्रिस्त अवस्थेत असलेला महाविकास आघाडी सरकारने या हल्लेखोरांवर ताबडतोब कारवाई करावी अन्यथा महाराष्ट्राची जनता रस्त्यावर उतरून सरकारला जाब विचारत त्याची जागा दाखवून देईल, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.