आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रतिक्रिया:राजीव सातव प्रचंड क्षमता असलेले नेते होते-नरेंद्र मोदी; अभ्यासू नेतृत्वाला महाराष्ट्र मुकला- देवेंद्र फडणवीस

मुंबई4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • महाराष्ट्राने एक निर्भिड, प्रामाणिक नेतृत्व गमावले- चंद्रकांत पाटील

काँग्रेस खासदार राजीव सातव यांचे आज कोरोनामुळे अवघ्या 47 व्या वर्षी निधन झाले. मागील 23 दिवसांपासून त्यांच्यावर पुण्यातील जहांगीर रुग्णालयात उपचार सुरू आहे. आज अखेर त्यांची मृत्यूशी झुंज अपयशी ठरली. त्यांच्या निधनाने राजकीय वर्तुळात हळहळ व्यक्त होत आहे.

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजीव सातव यांच्या निधनानंतर संसदेतील एक मित्र गमावल्याच्या भावना व्यक्त केल्या. ते म्हणाले की, संसदेतील माझे मित्र, राजीव सातव जी यांच्या निधनाचे वृत्ताने स्तब्ध झालोय. ते प्रचंड क्षमता असलेले आगामी नेते होते. त्याच्या कुटुंबीय, मित्र आणि समर्थकांप्रती दु: ख व्यक्त करतो. ओम शांती.'

अभ्यासू नेतृत्वाला महाराष्ट्र मुकला आहे- देवेंद्र फडणवीस

भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी राजीव सातव यांच्या निधनावर शोक व्यक्त केला. ते म्हणाले की, 'काँग्रेस नेते राजीव सातव यांच्या निधनाचे वृत्त अतिशय धक्कादायक आणि दुःखद आहे. तरुण, आश्वासक आणि अभ्यासू नेतृत्वाला महाराष्ट्र मुकला आहे. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली. या कठीण प्रसंगी हे दुःख सहन करण्याची शक्ती त्यांच्या कुटुंबियांना प्राप्त होवो, ही प्रार्थना करतो! ॐ शान्ति', अशा शब्दात त्यांनी भावना व्यक्त केल्या.

महाराष्ट्राने एक निर्भिड, प्रामाणिक नेतृत्व गमावले- चंद्रकांत पाटील

चंद्रकांत पाटील म्हणाले की, 'महाराष्ट्राचे उदयोन्मुख नेतृत्व ज्यांना राज्याची राजकीय स्थिती आणि सामाजिक प्रश्नांची जाण होती असे खासदार राजीव सातव यांची कोरोनाशी झुंज अपयशी ठरली. त्यांच्या निधनाची बातमी ही अतिशय दुःखद आणि धक्कादायक आहे. त्यांच्या निधनाने महाराष्ट्राने एक निर्भिड, प्रामाणिक नेतृत्व गमावले आहे. त्यांच्या दिवंगत आत्म्याला भावपूर्ण श्रद्धांजली.'

मराठवाड्यातील एक अभ्यासून नेता हरपला- पंकजा मुंडे
भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनीदेखील सातव यांच्या निधनावर दुःख व्यक्त केले. त्या म्हणाल्या की, काँग्रेसचे नेते, खा. राजीव सातव यांच्या निधनाने मराठवाड्यातील एक अभ्यासू व उमदा नेता हरपला.. त्यांना भावपूर्ण श्रध्दांजली.

बातम्या आणखी आहेत...