आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

भाजपचे टीकास्त्र:'अर्णब पाठोपाठ कंगना प्रकरणात ठाकरे सरकारचं थोबाड फुटलं, वर्षपूर्तीच्या मुहूर्तावर ठाकरे सरकारचे तोंड काळे'- अतुल भातखेळकर

मुंबई2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • कंगनाचा बंगल्यावर झालेली कारवाई बेकायदा असल्याचे मुंबई हायकोर्टाकडून स्पष्ट

मुंबई महापालिकेकडून अभिनेत्री कंगना रनोटच्या बंगल्यावर झालेली कारवाई बेकायदा होती असे शुक्रवारी मुंबई हायकोर्टाने स्पष्ट केले आहे. कंगनाला ही कारवाई थांबवण्यासाठी कायदेशीर मदत सुद्धा मिळू नये असे प्रयत्न झाल्याचे कोर्टाने म्हटले. यावरून आता भाजपने सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल केला आहे. 'अर्णब गोस्वामी पाठोपाठ कंगना प्रकरणात ठाकरे सरकारचं थोबाड फुटलं,' असा घणाघात भाजप आमदार अतुल भातखेळकर यांनी केला.

कोर्टाने दिलेल्या आदेशानुसार, कंगनाला ही कारवाई थांबवण्यासाठी कायदेशीर मदत सुद्धा मिळू नये असे प्रयत्न झाले. मुळात बीएमसीने (बृहन्मुंबई महापालिका) कंगनाच्या बंगल्यावर कारवाईसाठी जी नोटिस बजावली होती तीच हायकोर्टाने रद्दबातल ठरवली. ही कारवाई कंगनाच्या सोशल मीडियावर झालेल्या कॉमेंट्सवरून झाली असावी असेही कोर्टाने म्हटले. यावर भाजप आमदार अतुल भातखेळकर यांनी सोशल मीडियावरुन सरकारवर टीकास्त्र सोडले. 'अर्णब पाठोपाठ कंगना प्रकरणात ठाकरे सरकारचे थोबाड फुटले...महापालिकेची कारवाई बेकायदा. नुकसान भरपाई द्यावी लागणार..वर्षपूर्तीच्या मुहूर्तावर ठाकरे सरकारचे तोंड काळे...,' अशी टीका भातखेळकर यांनी केली.

हायकोर्टाची कंगनाला समज

मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरशी करणे, व्यक्तींविरोधात आक्षेपार्ह विधाने करणे, सरकारच्या विरोधात विधाने करणे या कंगनाच्या कृतीला हायकोर्ट मान्यता देत नाही. त्याच्याशी हायकोर्ट सहमत नाही. कंगनाने भविष्यात अशा पोस्ट करण्यापासून स्वतःला रोखावे, अशी समज हायकोर्टाने कंगनाला दिली आहे.

या निकालानंतर लोकशाहीचा विजय असल्याची प्रतिक्रिया कंगनाने दिली

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser