आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कथित ऑडिओ क्लीप:भाजप आमदार बबनराव लोणीकर यांची अधिकाऱ्यांना धमकी; ऑडिओ क्लीप व्हायरल

जालना2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • एका व्यक्तीच्या घरावरील कारवाईमुळे लोणीकर नाराज आहेत

माजी मंत्री आणि भाजप आमदार बबनराव लोणीकर यांची पोलिस कर्मचाऱ्याला धमकवण्याची कथित ऑडिओ क्लीप व्हायरल झाली आहे. जिल्ह्यातील व्यापाऱ्याच्या घरावर बेकायदा धाड टाकणाऱ्या पोलिस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना बोलताना लोणीकरांची जीभ घसर्लाये ऑडिओ क्लिपमधून समोर येत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, व्हायरल झालेल्या क्लिपमध्ये बबनराव लोणीकर पोलिसांना विधानसभेत उलटं टांगण्याची भाषा वापरल्याची माहिती आहे. या क्लिपमुळे लोणीकर अडचणीत येण्याची शक्यता आहे. 'एका कर्तृत्ववान व्यक्तीच्या घरावर कारण नसताना धाड का टाकता. तुमच्याकडे कोर्टाची परवानगी होती का ? असा सवाल करत लोणीकर त्या पोलिस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना उलटं टांगून मारण्याची भाषा वापरल्याची माहिती आहे. ही ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली आहे.

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser