आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पलटवार:'एका वाया गेलेल्या मुलाचा भडकलेला बाप बोलत होता', भाजप आमदार नितेश राणेंचा उद्धव ठाकरेंवर निशाना

मुंबईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राणे पितापुत्रांवर जोरदार टीका केली होती. 'बेडकं किती ही फुगले तरीही ते वाघ होत नाहीत. तुम्हाला माहितीच आहे, एक बेडूक आणि त्याची दोन पोरं या पक्षातून त्या पक्षात उड्या मारतात', असा टोला उद्धव ठाकरेंनी राणे लगावला होता. त्यावर आता भाजप आमदार नितेश राणे यांनी प्रत्युत्तर दिले आहे. 'काल एका वाया गेलेल्या मुलाचा भडकलेला बाप बोलत होता', अशा शब्दात नितेश राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या टीकेवर पलटवार केला.

नितेश राणे म्हणाले की, 'स्वतःच्या मुलाचे कर्तृत्व लपवण्यासाठी हे सर्व सुरू आहे. हे म्हणजे महाराष्ट्र आणि आम्ही बाहेरून आलोय का? पोलिसांबद्दल आम्हाला पण आदर आहे. यांनी आम्हाला शिकवू नये. बाळासाहेबांनी अंगणात तुळशी वृंदावनच लावले होते. पण यांचा श्रावणबाळ जिथे संध्याकाळी बसतो त्या डिनोच्या अंगणात तुळशी होती की गांज्याची शेती आहे ते तपासून पहा', असा घणाघात राणेंनी केला.

'सीबीआयला निःपक्षपातीने चौकशी का करू दिले जात नाहीये, काय झालं होतं दिशा सालियानच्या घरी, CDR रेकॉर्ड आणि सीसीटीव्ही फुटेज का समोर येऊ देत नाहीत? समित ठक्कर, साहिल चौधरी यांना अटक का केलं जातं आहे?' असा सवाल राणेंनी केली. तसेच, 'आज मुख्यमंत्री आहात म्हणून सर्व पुरावे तुम्ही नष्ट करू शकत नाही. आमच्याकडे काही ठोस पुरावे आहेत. सीबीआय हत्या की आत्महत्याचे संकेत देण्याचे काम करत नाहीत. त्यांचा रिपोर्ट आला की सगळं स्पष्ट होईल', असेही राणे म्हणाले.