आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराभाजप नेते आणि खासदार अनिल डॉ. अनिल बोंडे यांनी महाविकास आघाडीच्या सभेवरून राष्ट्रवादी काँग्रेसवर निशाणा साधला आहे. नॅरेटिव्ह सेट करण्यासाठी राष्ट्रवादीने छत्रपती संभाजीनगरमध्ये रामनवमीच्या अगोदर दंगल घडवली.
दरम्यान, भाजप राज्यसभेचे खासदार अनिल बोंडे यांनी धक्कादायक विधान केले आहे. खासदार इम्तियाज जलील आणि राष्ट्रवादीचा नेता मौलाना कादीर याचा मुलगा रियाजुद्दीन याचे भांडण झाले. यातूनच छत्रपती संभाजीनगरमधील किराडपुरा भागात हिंसाचार उफाळला होता. या हिंसाचाराला राष्ट्रवादी काँग्रेसच्या बड्या नेत्याची फूस होती असा दावा बोंडे यांनी केला आहे. अनिल बोंडे यांनी एका वृत्तवाहिनीशी संवाद साधला. यावेळी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर गंभीर आरोप केला आहे.
नेमके काय झाले?
खासदार इम्तियाज जलील आणि राष्ट्रवादीचा नेता मौलाना कादीर याचा मुलगा रियाजुद्दीन याचे भांडण झाले. इम्तियाज जलील यांना मारहाण करण्यासाठी तिथे रियाजुद्दीनचे लोक आले होते. त्यामुळे जलील यांनी बचावासाठी राम मंदिराचा आसरा घेतला. जलील मंदिरातून बाहेर येत नव्हते, त्यामुळे रियाजुद्दीनच्या लोकांनी मंदिरासमोर असलेल्या मुस्लिम समाजातील लोकांच्या दुकानांवर दगडफेक केली. त्यानंतर इम्तियाज जलील यांचे लोक तिथे आले आण हा हिंसाचार घडला. या दंगलीतील प्रमुख आरोपी, रियाजुद्दीन आणि मौलाना कादीर यांचे फोन कॉल्स तपासले पाहिजेत. कुठल्या राष्ट्रवादीच्या नेत्याची त्यांना फूस होती हे तपासलं पाहिजे असेही अनिल बोंडे म्हणाले आहेत. कारण दुसऱ्याच दिवशी देवेंद्र फडणवीस यांच्यावर आरोप होतात. फक्त एवढ्यासाठीच दंगल भडकवण्यात आलीका असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
किराडपुऱ्यात काय घडले
रामनवमीच्या पूर्वसंध्येला शहरातील किराडपुरा भागात दोन गटांत झालेल्या किरकोळ वादाचे पर्यवसान थेट दंगल भडकण्यात झाले. श्रीराम मंदिरासमोरच आधी दोन गट भिडले. मात्र त्यांच्या बचावासाठी समोर आलेल्या पोलिसांनाच एका गटाने टार्गेट करून त्यांच्यावर दगडफेक केली. शेकडोंच्या संख्येने दंगेखोर चालून येत असल्याचे पाहून मंदिर सुरक्षेला प्राधान्य देत पोलिसांनी वाहने सोडून मंदिरात सुरक्षा दिली. अधिकचा बंदोबस्त मागवण्यात आला.
त्याच वेळी समाजकंटकांनी पेट्रोलचे कापडी बोळे करून त्याला आग लावून पोलिसांची 14 वाहने पेटवून दिली. दगडफेकीत 17 पोलिस कर्मचारी जखमी झाले. अधिकची कुमक येताच पोलिसांनी अश्रुधुराचे नळकांडे फोडले. तरीही जमाव नियंत्रणात येत नसल्याने हवेत गोळीबार करण्यात आला. यात एक जण गंभीर जखमी झाला आहे.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.