आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करावर्ध्याचे भाजपचे खासदार रामदास तडस यांच्या सुनेने गंभीर आरोप केला आहे. रामदास तडस यांच्या सुनेने आपल्यावर कुटुंबाकडून अन्याय होत असल्याचा आरोप केला आहे. एवढेच नाही तर त्यांना मारहाण होत असल्याचा दावा आहे. त्यांनी रडत रडत व्हिडिओ शूट करुन राष्ट्रवादीकडे मदत मागितली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांच्याकडे त्यांनी मदतीची मागणी केली आहे.
व्हिडिओमध्ये संबंधित महिलेची चाकणकर यांच्याकडे मदतीची मागणी
'मी पूजा, रूपालीताई चाकणकर यांच्याकडे मदत मागतेय. माझ्या जीवाला इथे धोका आहे. प्लीज मॅडम मला इथून घेऊन चला, मी विनंती करते', असे व्हिडिओमधील महिला म्हणताना दिसत आहे. याविषयी अधिक माहिती देताना रूपाली चाकणकर म्हणाल्या, आज सकाळी माझ्या व्हाट्सअप नंबरवर हा व्हिडीओ आला. त्यानंतर संबंधित महिलेने मला फोन करून तडस कुटुंबीयांपासून आपल्या जीवाला धोका असल्याचे सांगितले. त्यानंतर मी संबंधित पोलीस आणि माझ्या महिला पदाधिकाऱ्यांना त्या महिलेला संरक्षण देण्यासाठी सांगितले आहे.
कारवाईची मागणी
ही महिला वर्ध्याचे भारतीय जनता पक्षाचे खासदार रामदास तडस यांची सून आहे. तडस कुटुंबीय तिला मागील अनेक दिवसांपासून मानसिक त्रास देत आहेत. मारहाण करत आहेत. तडस कुटुंबीयांच्या त्रासाला कंटाळून ही महिला प्रचंड घाबरलेली आहे. त्यामुळे स्थानिक पोलिसांनी या महिलेची तक्रार नोंदवून घ्यावी आणि आणि आरोपींवर कडक कारवाई करावी, असे त्या म्हणाल्या. घरातील महिलेला त्रास देणे ही अत्यंत निंदनीय आहे. शेवटी लोकशाही पुढे आरोपी हा आरोपी असतो. आरोपींवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी रूपाली चाकणकर यांनी केली आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.