आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सातारा:खासदार उदयनराजे भोसले आंदोलनाला एकटेच आल्याने गुन्हा नाही - एसपी बन्संल

सातारा2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • सातारा जिल्ह्यात आज केंद्रीय पथक आहे.

लॉकडाऊनचे पालन सर्वांनी केले पाहिजे. कालच्या आंदोलनाला खासदार उदयनराजे भोसले एकटेच आले असल्याने गुन्हा दाखल केला नसल्याचे जिल्हा पोलिस प्रमुख अजयकुमार बन्संल यांनी सांगितले. सातारा शहरात वीकेंड लॉकडाऊनची पोलिस प्रमुख अजयकुमार बन्संल यांनी पाहणी केली. त्यावेळी ते पत्रकारांशी बोलत होते.

ते म्हणाले, वीकेंड लॉकडाऊनला लोकांनी चांगला प्रतिसाद दिला आहे. प्रत्येक चौकावर पोलिस आहेत. शासनाच्या नियमांचे जर कोणी पालन केले नाही, तर आम्ही कारवाई करणार आहे. ज्याला परवानगी नाही, त्याने दुकान उघडले तर त्याच्यावर कारवाई करण्यात येणार आहे.

सातारा जिल्ह्यात आज केंद्रीय पथक आहे. पथकाने बाधितांची संख्या वाढणार असल्याचे सांगितले आहे. कोरोनाची दुसरी लाट 15 फेब्रवारीपासून सुरू झाली आहे. पोलिसांनी 13 हजारपेक्षा जास्त विनामास्क लोकांच्यावर कारवाई केलेली आहे. तर तीनशेच्यावर एआयआर केल्या आहेत. बावधान यात्रा संबधी 100 पेक्षा अधिक लोकांना अटक केली आहे. तेव्हा लोकांनी नियमांचे पालन करावे, अन्यथा कारवाई शंभर टक्के होणारच.

बातम्या आणखी आहेत...