आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दादांवर भडकले दादा:झोपेत सरकार कसे आणायचे हे अजितदादांना चांगलेच माहीत!; भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची टीका

कोल्हापूर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • पाटील यांच्या या वक्तव्यावरून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पाटील यांच्यावर टीका केली होती.

झोपेत सरकार तुम्ही आणले, पवार साहेब झोपेतून उठायचे होते त्या वेळी तुम्ही शपथविधी पार पाडला. त्यामुळे झोपेत कसे सरकार आणायचे हे अजित पवार यांना माहिती आहे. अजित पवार यांच्यासारखे दीर्घकाळ सत्तेत असणारे नेते यांना आपण काल काय केले याची आठवण राहत नाही. त्यामुळे ज्यांच्या मांडीला मांडी लावून तीन दिवसांचे सरकार केले त्यांच्यावर टीका करताना अजित पवारांनी विचार करून बोलावे, असे अजित पवार यांच्या टीकेला सडेतोड प्रत्युत्तर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी कोल्हापुरात रविवारी दिले.

या वेळी बोलताना चंद्रकांत पाटील यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार, शिवसेना नेते संजय राऊत यांच्यावर सडकून टीका केली. अजित पवारांबद्दल बोलताना पाटील म्हणाले, तुम्हाला तलवार लावून आणून उभे केले होते का? तुम्हाला २८ आमदार सोबत ठेवता आले नाहीत. ते शरद पवारांकडे पळून गेले. तुम्ही आमच्या सरकारमध्ये उपमुख्यमंत्री व महाविकासमध्ये उपमुख्यमंत्री, उद्या तिसऱ्याच सरकारमध्ये उपमुख्यमंत्री व्हाल. मात्र, तुम्ही सर्वत्र पाहिजेत, तुम्हाला तत्त्व-व्यवहार-सांगड नाही, तुमचे फक्त एकच तत्त्व आहे, ते म्हणजे ज्याचे सरकार त्यांच्यासोबत मी जाणार, अशी टीकाही चंद्रकांत पाटील यांनी अजित पवार यांच्यावर या वेळी बोलताना केली.

...तर पेट्रोल दर वाढतीलच
राज्यात सध्या इंधन दरवाढीचा भडका उडाला आहे. त्यावर पाटील म्हणाले, जागतिक स्तरावर भाव वाढले की देशात पेट्रोलचे दर वाढतच राहतात. दर कमी करायचे असतील तर जागतिक स्तरावर प्रयत्न झाले पाहिजेत. मात्र ते शक्य नाही. राज्य व केंद्र सरकारने कर कमी केले तर पेट्रोलचे दर आटोक्यात येतील. तसेच आघाडी सरकारनेदेखील शेजारच्या राज्यातील इंधन दराचा विचार करून आपल्या राज्यातील इंधनावरील कर कमी करावेत. जनतेला इंधन दरवाढीतून दिलासा द्यावा, असा टोलाही त्यांनी लगावला.

काय म्हणाले होते अजित पवार?
काही दिवसांपूर्वी चंद्रकांत पाटील यांनी ठाकरे सरकार झोपेत असतानाच पडेल, असे म्हटले होते पाटील यांच्या या वक्तव्यावरून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पाटील यांच्यावर टीका केली होती. ते म्हणाले, सरकार जाणार, हे वक्तव्य चंद्रकांत पाटील यांनी जागे असताना केले की झोपेत केले होते? ज्या दिवसापासून महाविकास आघाडी सरकार आले तेव्हापासून भाजप नेत्यांना असह्य झाले आहे. त्यांना आपण सरकारमध्ये नाही हे सतत बोचत असते. कार्यकर्त्यांनी सोबत राहावे यासाठी ते काही ना काही बोलत राहतात, असे पवार म्हणाले होेते.

राऊतांचा निरोप मोदींना देऊ
संजय राऊत यांच्यावर मी नेहमीच बोलत आहे. मात्र, ते काही बोलणे थांबवत नाहीत. तरीही आता त्यांनी पंतप्रधान मोदींना आत्मचिंतन करण्याची गरज असल्याचा सल्ला दिला आहे. त्यांचा तो सल्ला मी पंतप्रधानांपर्यंत पोहोचवतो. पंतप्रधान त्यांची सूचना मान्य करतील. परंतु संजय राऊत यांनीदेखील बाळासाहेब ठाकरे यांच्या फोटोसमोर बसावे, डोळे मिटून त्यांना विचारावे तुमचे मत काय? त्या वेळी बाळासाहेब ठाकरे हे राऊत यांना वरून थोबाडीत मारतील, अशी टीकाही त्यांनी केली.

बातम्या आणखी आहेत...