आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हिंगोली:देवळात भजन, किर्तन करायचे नाही तर तेथे बसून संजय राऊतांचे अग्रलेख वाचायचे काय? भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांचा सवाल

हिंगोली3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • शिवसेना एकटी लढल्यानंतर किती जण निवडून येतात ते पाहू

राज्यातील मंदिर उघडण्यासाठी भाजपने अनेक वेळा आंदोलन केले, घंटानाद केला, शंखनाद केला अखेर सरकारला जाग आली अन मंदिर उघडले. मात्र ६० वर्षाच्या वरील नागरिकांना मंदिरात भजन, किर्तनाला मनाई केली, मग आता मंदिरात जाऊन संजय राऊतांचे अग्रलेख वाचायचे काय असा सवाल भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकात पाटील यांनी बुधवारी ता. २० येथे केला.येथील शासकिय विश्रामगृहात भाजपच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांच्या बैठकीत ते बोलत होते.

यावेळी बोलतांना पाटील म्हणाले की, राज्यातील मंदिरे उघडण्यासाठी आंदोलने करावी लागली. त्यानंतर सरकारने मंदिर उघडले. मात्र ६० वर्षाच्या वरील नागरिकांना मंदिरात प्रवेश करण्यास मनाई केली तसेच मंदिरात भजन, किर्तन प्रवचन करण्यावरही बंद केली. मग मंदिरात जाऊन संजय राऊत यांचे अग्रलेख वाचायचे काय असा सवाल केला. मंदिरात गेल्यानंतर भजन, किर्तन करणे स्वाभाविकच असल्याचे त्यांनी सांगितले.

हिंगोली जिल्हयात अतिवृष्टीमुळे नुकसान होऊनही सरकारचा एकही मंत्री आला नाही हि गंभीर बाब आहे. त्यासाठी आता पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आंदोलन केले पाहिजे. प्रत्येक बाबीवर प्रतिक्रिया दिली पाहिजे असेही त्यांनी सांगितले. या सोबतच कोणत्याही निवडणुका बिनविरोध होऊ देऊ नका. प्रत्येक निवडणुक लढवलीच पाहिजे. वेळ प्रसंगी पराभव पत्करावा लागला तरी चालेल पण बिनविरोध निवडणुक होऊ देऊ नका असा सल्ला त्यांनी कार्यकर्त्यांना दिला.

शिवसेना एकटी लढल्यानंतर किती जण निवडून येतात ते पाहू
मुंबईसह राज्यात शिवसेना- भाजपने एकत्रीत निवडणुका लढविल्यामुळे शिवसेनेला फायदा झाला. मुंबईत शिवसेनेचे नगरसेवक ८४ तर भाजपाचे ८२, शिवसेनेचे १४ तर भाजपचे १६ आमदार निवडणुक आले. आता शिवसेना एकट्याने निवडणुक लढल्यानंतर किती जण निवडून येतात ते पाहू असा टोलाही चंद्रकांत पाटील यांनी लगावला

बातम्या आणखी आहेत...