आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

टीका:देशात धर्मांधता रुजवण्यात  भाजप यशस्वी : शरद  पवार

सांगली4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • अहिल्याबाई होळकरांच्या पुतळ्याचे अनावरण

नरेंद्र मोदी यांनी २०१९ मध्ये केंद्राची सत्ता पुन्हा हाती घेतली. त्यानंतर भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाकडून स्वातंत्र्य लढ्यात सहभागी होणाऱ्या महात्मा गांधी, पंडीत नेहरू यांच्यासह अनेक स्वातंत्र्यसैनिकांवर टीका केली जात आहे. आता दुर्दैवाने धर्मांधता रुजवण्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी व त्यांचा पक्ष यशस्वी ठरत असल्याचा भास होत आहे. देशाचे नेतृत्व करणाऱ्या सत्ताधारी पक्षाचे हे कृत्य दुर्दैवी आहे, अशी टीका राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नाव न घेता केली.

सांगलीत उभारण्यात आलेल्या अहिल्याबाई होळकर स्मारकाचे उद्घाटन राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या हस्ते करण्यात आले. पवार म्हणाले, कर्नाटकात भाजपचे सरकार आहे. या राज्यात उत्तर प्रदेश निवडणुकीच्या प्रचारावेळी हिजाबचा मुद्दा तेवत ठेवला. राज्यातील अल्पसंख्याक समाजातील व्यावसायिकांकडून साहित्य खरेदी करू नका, असा फतवा काही हिंदुत्ववादी संघटनांनी काढला आहे. हा अल्पसंख्याक समाजावर अप्रत्यक्षरीत्या बहिष्कार घालणारा आहे. तसेच याला तेथील सरकार खतपाणी घालत आहे. देशाच्या स्वातंत्र्यावेळी धर्म आणि जातीत विभागलेल्या समाजात एकात्मता निर्माण करून महात्मा गांधी, जवाहरलाल नेहरू यांनी स्वातंत्र्य लढा उभारला. सर्व जाती-धर्माच्या देशप्रेमी जनतेने त्यांना उदंड सहकार्य केले. देशासाठी ज्यांनी सर्वस्व अर्पण त्यांच्यावरच आता टीका करण्यात येत असल्याचे ते म्हणाले.

भाजपतील काही नेते राष्ट्रवादीच्या वाटेवर : पाटील
महाविकास आघाडीत मुख्यमंत्री व गृहमंत्र्यांच्या खात्यावरून उभी फूट असे वृत्त भाजपने पसरवले होते. त्यात कोणतेही तथ्य नाही. भाजपतीलच काही नेते राष्ट्रवादीत प्रवेश करण्यासाठी इच्छुक आहेत. मात्र आम्ही हवेतल्या गप्पा मारत नाही, त्यांच्या पक्षप्रवेशावेळीच त्यांची नावे उघड करू, असा टोला राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी लगावला. पश्चिम महाराष्ट्रातील भाजपचे वरिष्ठ नेते व माजी मंत्री शिवाजीराव नाईक यांनी शनिवारी शरद पवारांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. आणखी काही नेते राष्ट्रवादीच्या संपर्कात आहेत.

बातम्या आणखी आहेत...