आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पवारांचा केंद्रावर निशाणा:शालेय अभ्यासक्रमातूनच विद्यार्थ्यांच्या मनात विष पेरण्याचा प्रयत्न, धार्मिक तेढ निर्माण करणाऱ्या शक्तींचा जोर वाढतोय

नवी दिल्ली4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

देशात शालेय अभ्यासक्रमातूनच विद्यार्थ्यांच्या मनात विष पेरण्याचा प्रयत्न सुरू आहे, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला आहे. दिल्लीतील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने गुरुवारी अल्पसंख्याक विभागाचे संमेलन आयोजित करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते.

काही दिवसांपूर्वीच झालेल्या राष्ट्रवादीच्या संमेलनात संयुक्त पुरोगामी आघाडी म्हणजेच युपीएचे अध्यक्ष शरद पवार यांना करावे, अशी मागणी करण्यात आली होती. यानंतर विविध प्रकारच्या चर्चा सुरू झाल्या असतानाच शरद पवारांनी भाजपवर तोफ डागली आहे. यावेळी बोलताना शरद पवार म्हणाले की, देशात काय परिस्थिती आहे हे सर्वांना दिसत आहे. देशात धार्मिक तेढ निर्माण करणाऱ्या शक्तींचा जोर वाढत आहे. या सर्व शक्तींच्या विरोधात लढण्याची आवश्यकता आहे.

पंतप्रधान मोदींवर अप्रत्यक्ष निशाणा
संमेलनात शरद पवारांनी अनेक मुद्द्यांवरून केंद्र सरकारवर टीका केली. महागाईच्या मुद्यावरूनही त्यांनी केंद्र सरकारला धारेवर धरले. देशात महागाईची एवढी मोठी समस्या असताना, काश्मीर फाईल या चित्रपटाच्या माध्यमातून खोटा प्रपोगंडा राबविला जात आहे, असा आरोप शरद पवारांनी केला आहे. आज ज्याच्या हाती सत्ता आहे, तोच असा प्रचार करीत आहे, असे म्हणत त्यांनी अप्रत्यक्ष पंतप्रधान मोदींवर टीका केली.

देशपातळीवरील राजकारणात पवार आक्रमक
काहीच दिवसांपूर्वी बारामतीत सर्वपक्षीय खासदार आणि उद्योगपती यांचा दौरा झाला होता. यानंतर पवारांनी दिल्लीत संम्मेलन घेतले आणि पुन्हा एकदा भाजपवर तोफ डागली आहे. यामुळे देशपातळीवरील राजकारणात पवार पुन्हा आक्रमकपणे समोर येत असल्याचे दिसत आहे.

बातम्या आणखी आहेत...