आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पवारांचे मोठे वक्तव्य:'आसाम व्यतिरिक्त इतर राज्यात भाजपची सत्ता येणार नाही,' शरद पवारांचे मोठे वक्तव्य

मुंबईएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • बारामतीमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत पवारांनी आगामी निवडणुकांवर भाष्य केले

लवकरच पश्चिम बंगालसह पाच राज्यांत विधानसभा निवडणूक होणार आहे. यात कुणाची सत्ता येईल, याकडे सर्व देशाचे लक्ष लागून आहे. दरम्यान, या राज्यातील निकालांवर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी मोठे वक्तव्य केले आहे. 'आसाम व्यतिरिक्त इतर कोणत्याही राज्यात भाजपची सत्ता येणार नाही', असे शरद पवारांनी म्हटले आहे. शरद पवार बारामतीमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.

यावेळी शरद पवार म्हणाले की, 'पाच राज्यातील निवडणूकांबाबत आज बोलणे अवघड आहे, पण लोक निर्णय घेत असतात. एकंदरीत त्या राज्यांची परिस्थिती पाहता केरळमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासह डावे एकत्र आले आहेत. त्यामुळे केरळमध्ये आम्हाला स्पष्ट बहुमत मिळेल. तमिळनाडूतही लोकांच्या मनाचा कौल हा स्टॅलिन, डीएमके यांच्या बाजूने आहे. पण, आसाममध्ये भाजपाचे राज्य आहे. त्यांची तुलनात्मक स्थिती चांगली असल्यामुळे आसाम वगळता इतर राज्यात भाजपाची सत्ता येणार नाही', असे शरद पवार म्हणाले.

पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी सत्ता खेचून आणतील

शरद पवार पुढे म्हणाले की, 'पश्चिम बंगाल मध्ये भाजप सत्तेचा गैरवापर करत आहे. तिथे एकटी भगिनी आपल्या राज्यातील लोकांसाठी संघर्ष करत आहे. तिच्यावर भाजपकडून वारंवार राजकीय हल्ले होत आहेत. पण, बंगालमधील लोक स्वाभिमानी आहेत. त्यांच्या संस्कृती व बंगाली मनावर कुणी घाव घालण्याचा प्रयत्न केला, तर संपूर्ण राज्य एकसंघ होईल', असे पवार म्हणाले.

बातम्या आणखी आहेत...