आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आरोप-प्रत्यारोपांची 'धुळवड':राज्यात पुन्हा भाजपची सत्ता येणार नाही, संजय राऊत यांचे फडणवीसांना प्रत्युत्तर

मुंबई2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीच्या सरकारला अडीच वर्षे पूर्ण झाली आहेत. आणखी अडीच वर्ष महाविकास आघाडीचे सरकार कायम राहणार आहे. तसेच यापुढील काळातही राज्यात आघाडीचे सरकार येईल, असा ठाम विश्‍वास शिवसेना खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केला. राज्यामध्ये पुन्हा भाजपची सत्ता येणार नाही, असे स्पष्ट करत त्यांनी विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांना प्रत्युत्तर दिले.

गोव्यासह पाच राज्यात झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपला चांगले यश मिळाले आहे. गोव्याची जबाबदारी असलेल्या देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या कामगिरी मुळे भाजपचा विश्वास दुणावला आहे. या विजयाच्या पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस यांची नागपुरात मिरवणूक काढत सत्कार करण्यात आला. यावेळी केंद्रीय मंत्री नितिन गडकरी आणि देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रामध्ये पुन्हा भाजपची सत्ता येणार, असा ठाम विश्वास व्यक्त केला होता. खासदार संजय राऊत यांनी प्रत्युत्तर देत फडणवीस यांच्या दाव्याला खोडले आहे.

महाविकास आघाडी घाबरणारे नाही

केंद्रीय तपास यंत्रणेच्या माध्यमातून महाविकास आघाडीच्या नेत्यांवर होत असलेली कारवाईचाही त्यांनी समाचार घेतला. केंद्रीय तपास यंत्रणांच्या माध्यमातून देण्यात येणाऱ्या धमक्यांना आघाडीचे नेते घाबरत नसल्याचे ते म्हणाले. सध्या राज्यातील दोन महत्त्वाचे नेते या तपास यंत्रणांच्या ताब्यात आहेत. तर अनेक नेत्यांची चौकशी सुरू आहे.

गोवा तर पोर्तुगीजांनाही समजला नाही

गोव्यामध्ये चमकदार कामगिरी करत भारतीय जनता पक्षाची सत्ता आली आहे. यावर देखील राऊत यांनी भाजप तसेच फडणवीसांना टोला लगावला आहे. गोव्यावर अनेक वर्षे पोर्तुगिजांची सत्ता होती, परंतु पोर्तुगीजांनाही गोवा समजला नसल्याचे त्यांनी म्हटले आहे. गोव्यात सत्ता आल्याने फडणवीसांचा उत्सव वाढला असेल तर त्यांना माझ्या शुभेच्छा, असल्याचेही ते म्हणाले.

बातम्या आणखी आहेत...