आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजातीवाचक शिवीगाळ करणे आणि गाडीत पिस्तूल आढळल्याप्रकरणी करुणा शर्मा यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. मात्र, करुणा शर्मा यांच्यावर अन्याय होत असल्याचे मत बीड भाजपने व्यक्त केले आहे. त्यामुळे करुणा शर्मा यांच्या समर्थनात बीडमध्ये भाजप आता मैदानात उतरणार आहे, अशी घोषणाच भाजपचे बीड जिल्हाध्यक्ष राजेंद्र म्हस्के यांनी केली आहे. करुणा शर्मा यांच्या गाडीमध्ये पिस्तूल ठेवण्यात आले, त्याची सखोल चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी भाजपकडून करण्यात आली आहे.
करुणा शर्मा प्रकरणात पोलिसांची संशयास्पद भूमिका, सत्तेचा दुरूपयोग, गाडीत शस्त्र कुणी ठेवले याची सखोल चौकशी होणे गरजेचे आहे. व्हायरल व्हिडिओमध्ये आजूबाजूला पोलिस दिसत आहेत. जिथे अन्याय तिथे भाजपा उभा राहणार करुणा शर्मा प्रकरण हे कौटुंबिक नसून आता ते सार्वजनिक झाले आहे. एखादी महिला शस्त्राने हल्ला कसा करेल करुणा शर्मा यांना यांचे विरुद्ध ॲट्रॉसिटी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. करुणा शर्मा यांनी न्यायालयीन मदत मागितल्यास ती देखील करणार असल्याचे बीड राजेंद्र मस्के यांनी सांगितले.
याप्रकरणावर पहिल्यांदाच भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
पंकजा मुंडे ट्वीटमध्ये काय म्हणाला?
अन्याय चुकीच्या लोकांच्यात ताकत असल्यामुळे होतो असे नाही, पराक्रमी हात बांधून बसतात म्हणून होतो. शासन, प्रशासन, न्यायव्यवस्था कोणी आपल्या दारात नाही बांधू शकत हा विश्वास हरवू नये, wrong president should not be set! ही काळाची गरज आहे, परळी सुन्न आहे मान खाली गेली आहे राज्याची.. असं ट्वीट पंकजा मुंडे यांनी केले आहे.
राम शिंदेंचा धनंजय मुंडेंवर घणाघाती आरोप
भारतात सर्वांना स्वातंत्र्य आहे. स्वतःचे मत मांडण्याचं स्वातंत्र्य आहे, अस असताना परळीत जे घडलं आणि सोशल मीडियावर जे पाहायला मिळालं ते चुकीचं आहे. याची सखोल चौकशी झाली पाहिजे. जे सत्य आहे ते समोर यायला हवं. शेवटी कुणाला अडवून, कुणाला दडवून काम होणार नाही. परंतु राज्यातील एखाद्या मंत्र्यानं अशा अन्याय आणि अत्याचाराची भूमिका घेतली तर त्याची सखोल चौकशी होण्याची गरज आहे, अशी प्रतिक्रिया राम शिंदे यांनी केली आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.