आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • 'BJP Would Have Got More Than 150 Seats In The Assembly If We Had Contest Election Without Alliance' Devendra Fadnavis

फडणवीसांचा दावा:'युती केली नसती, तर विधानसभेत भाजपला 150 पेक्षा जास्त जागा मिळाल्या असत्या'- देवेंद्र फडणवीस

मुंबईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

विधानसभा निवडणुकीत युती केली नसती, तर भाजपला 150 पेक्षा जास्त जागा मिळाल्या असत्या, असे विधान विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वाढदिवसानिमित्त आयोजित सेवा सप्ताहाच्या व्हर्च्युअल रॅलीत ते बोलत होते. पत्रकार भाऊ तोरसेकर यांच्या भाकितांच्या आधारे त्यांनी हे विधान केले आहे.

यावेळी देवेंद्र फडणवीस म्हणाले की, 'भाऊ तोरसेकर यांनी 2013 मध्येच सांगितले होते की भाजपने नरेंद्र मोदींना पंतप्रधान पदाच्या उमेदवारीसाठी निवडले तर संपूर्ण बहुमत भाजपला मिळेल. त्यावेळी अनेकांना हे जरा जास्तच सांगत आहेत असे वाटले होते. पण, ते खरे ठरले. 2019 मध्ये देखील देशात अस्थिरतेचे वातावरण होते. त्यावेळीही भाऊ तोरसेकर यांनी भाजपला 300 पेक्षा अधिक जागा मिळतील असे सांगितले होते. ते देखील सत्य झालेले आपण बघितले. खरं म्हणजे एकच गोष्ट आपली चुकली. भाऊ तोरसेकर यांनी विधानसभेच्या आधी एक पुस्तक लिहिले होते. त्यात त्यांनी भाजपला पर्याय दिले होते. भाजप 150+ किंवा युती 200+. त्यावेळी आपण युतीचा पर्याय निवडला. तो पर्याय स्वीकारला नसता तर भाऊ तोरसेकर यांचे तिसरे भाकित देखील खरे ठरले असते', असे फडणवीस म्हणाले.