आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मराठा आरक्षण:मराठा आरक्षणासाठी भाजपची समिती; कार्यकर्ते आंदोलनातही सहभागी होणार

मुंबई4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • आघाडी सरकारने मराठा आरक्षणाचा खून केला : चंद्रकांत पाटील

मराठा समाजाला पुन्हा आरक्षण मिळावे यासाठी समाजातर्फे होणाऱ्या आंदोलनाला भारतीय जनता पक्षाचा संपूर्ण पाठिंबा असेल. पक्षाचे नेते-कार्यकर्ते त्यामध्ये सहभागी होतील, अशी घोषणा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी रविवारी येथे केली.

निकालपत्राचा अभ्यास करून आघाडी सरकारने आरक्षणाचा खून केला असून त्याची पोलखोल करण्यासाठी भाजप कायदेतज्ञांची समिती नेमणार आहे, असे त्यांनी सांगितले. मराठा आरक्षणासाठी पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पक्षाची उच्चस्तरीय समिती स्थापन करण्यात आली. या समितीची पहिली बैठक रविवारी मुंबईत झाली. त्यानंतर पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

दरेकर, मेटेंचा समावेश
मराठा समाजाला पुन्हा आरक्षण मिळावे यासाठी प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखालील भाजपच्या समितीमध्ये विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, प्रदेश सरचिटणीस श्रीकांत भारतीय, आमदार आशिष शेलार, शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे व नरेंद्र पाटील यांचा समावेश आहे.

बातम्या आणखी आहेत...