आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कारशेड:कांजूरमार्ग कारशेडचे काम थांबवण्यामागे भाजपचे कटकारस्थान- नवाब मलिक

मुंबईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

आरे कारशेडला पर्याय म्हणून मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेल्या कांजूरमार्गच्या जागेवर केंद्राने दावा केला आहे. यावरुन राजकारण चांगलेच तापले आहे. यातच अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. 'कांजूरमार्ग कारशेड हा मुंबईच्या दोन लाईनला जोडणारा प्रकल्प असून 20 लाख लोकांना त्याचा फायदा मिळवून देणारा असल्याने हे काम कसे थांबवायचे यासाठी भाजपाकडून कटकारस्थान सुरू आहे,' असा आरोप मलिक यांनी केला आहे.

मलिक पुढे म्हणाले की, 'केंद्राच्या उद्योग संवर्धन आणि अंतर्गत व्यापार (डीआयपीपी) मंत्रालयाने राज्याच्या मुख्य सचिवांना पत्र पाठवले आहे. या पत्रात मेट्रो कारशेडची जागा राज्यसरकारने एमएमआरडीएला वर्ग केली ती जागा मिठागरांसाठी आहे आणि आता कारशेडला दिलेली चुकीच्या पद्धतीने देण्यात आली आहे असे म्हटले आहे. तर, याआधी मिठागराच्या बर्‍याचशा जागा केंद्राने राज्यसरकारला 2002 सालीच वर्ग केल्या आहेत', अशी माहिती नवाब मलिक यांनी दिली आहे.