आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भाजपचं मिशन!:भाजपच्या 'जन आशीर्वाद यात्रे'ला आजपासून सुरुवात, केंद्र सरकारने देशात केलेल्या कामांना सामान्यांपर्यत पोहचवण्यासाठी भाजपकडून यात्रा

2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

भाजपकडून आजपासून देशभरात 'जन आशीर्वाद' यात्रा सुरु करण्यात आली आहे. महाराष्ट्रातील केंद्रीय मंत्र्यांनीही आपल्या 'जन आशीर्वाद' यात्रेची सुरुवात केली आहे. पंतप्रधान मोदींनी आतापर्यंत केलेल्या कामांना सामान्यापर्यंत पोहोचवण्यासाठी ही यात्रा भाजपने काढली आहे.

भागवत कराड यांनी ट्विटरच्या माध्यमातून आपल्या यात्रेची घोषणा केली. “भव्य जनआशिर्वाद यात्रा दि. 16 ते 21 ऑगस्ट 2021, मुंडे साहेबांचा आशिर्वाद व जनतेचा पाठिंब्या मुळेच आज इथवर पोहोचलो, येत आहे जनतेचा आशिर्वाद घ्यायला”, असं ट्वीट भागवत कराड यांनी केले.

भाजपची ही जन आशीर्वाद यात्रा 19,567 किमीहून अधिक लांबीची असणार असून ती 19 राज्यातून जाणार आहे. या दरम्यान 1663 लहान-मोठे कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत.

दरम्यान, केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार यांच्या नेतृत्वाखाली पालघरमधून जन आशीर्वाद यात्रा सुरु झाली आहे.

बातम्या आणखी आहेत...