आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सातारा जिल्ह्यातील घटना:मद्यधुंद शिपायाने विहिरीत टाकली पोते भरून ब्लीचिंग पावडर; गावाची परसाकडे पळापळ; जुलाब-उलट्यांमुळे 50 ग्रामस्थ रुग्णालयात

सातारा4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • आरोग्य विभागाकडून प्रत्येक घराची तपासणी

ग्रामपंचायतीच्या शिपायाने मद्याच्या नशेत गावातील ब्लीचिंग पावडरचे अख्खे पोते एका विहिरीत टाकल्यामुळे गावकऱ्यांना परसाकडे धाव घ्यावी लागली. जुलाब, उलट्यांचा त्रास झाल्याने ५० गावकऱ्यांना वाई,पाचवड येथील रुग्णालयांमध्ये दाखल करावे लागले. यातील एकाची प्रकृती गंभीर आहे. जावली तालुक्यातील सरताळे गावातील या घटनेमुळे सातारा जिल्ह्यात खळबळ उडाली. या शिपायावर आता कारवाई करणार असल्याचे गटविकास अधिकाऱ्याने सांगितले.

सरताळे ग्रामपंचायतीच्या शिपायाने मंगळवारी रात्री मद्यधुंद अवस्थेत गावातील नळ पाणीपुरवठा योजनेच्या विहीरीत ब्लीचिंग पावडरचे अख्खे पोते रिकामे केले. हे कमी म्हणून की काय, बुधवारी सकाळी पुन्हा उरलीसुरली पावडरही टाकून दिली. सकाळी काही तासांनंतर काही ग्रामस्थांना जुलाब, उलट्यांचा त्रास सुरू झाला. परंतु हळूहळू त्याचे प्रमाण वाढले. एकीकडे गावकऱ्यांची परसाकडे पळापळ सुरू झाली, तर दुसरीकडे आरोग्य विभागाची धावपळ उडाली. अखेर आरोग्य विभागाने पाण्याची तपासणी केली असता दूषित पाण्यामुळे त्रास झाल्याचे कर्मचाऱ्यांच्या लक्षात आले.शिपायाच्या करामतीमुळे हा प्रकार घडल्याचे समोर आले.

आरोग्य विभागाकडून प्रत्येक घराची तपासणी
गॅस्ट्रोसदृश प्रकारामुळे आरोग्य विभागाने तत्काळ तपासणी मोहीम हाती घेतली. आधी विहिरीतील सर्व पाणी उपसा करून काढण्यात आले. त्यानंतर प्रत्येक घरात जाऊन तपासणी करण्यात आली. गुरुवारी सकाळी पाणीपुरवठा सुरळीत होईल, असे गटविकास अधिकारी सतीश बध्ये यांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...