आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

धक्कादायक दृष्य:कचऱ्याच्या पिशवीत भरला कोरोना रुग्णाचा मृतदेह, भाजप नेते किरीट सोमैयांनी शेअर केला व्हिडिओ

मुंबई9 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर सरकारच्या कार्यशैलीवर प्रश्नचिन्ह

महाराष्ट्रात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. दरम्यान, मुंबई जवळील ठाण्यातून एक लाजीरवाने दृष्य समोर आले आहे. भाजप नेते किरीट सोमैया यांनी सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे. त्यानुसार,गाडीत तीन मृतदेह ठेवले असून त्यातील एका मृतदेहाला कचऱ्याच्या पिशवीत पॅक करण्यात आले आहे.

हा व्हिडिओ ठाण्यातील एका खासगी रुग्णालयातील असल्याचे बोलले जात आहे. हॉस्पिटलमधून मृतदेहांना गाडीत टाकले जात होते. यादरम्यान कुणीतरी हा व्हिडिओ शूट करुन व्हायरल केला.

काय आहे व्हायरल व्हिडिओमध्ये ?

व्हिडिओमध्ये दिसत आहे की, मृतदेह स्ट्रेचरवर पडले आहेत. त्यापैकी एका मृतदेहावर काळी पॉलिथीन ठेवली असून, चेहरा पांढऱ्या पॉलिथीनने झाकला आहे. एकूण तीन मृतदेह पॉलिथीनमध्ये पॅक केलेले दिसत आहेत.

भाजप नेते किरीट सोमैया यांनी हा व्हिडिओ शेअर करत लिहीले, “आता ठाकरे सरकार प्लास्टिक आणि कचऱ्याच्या पिशवीचा वापर कोरोनामुळे मृत्यू झालेल्या लोकांना पॅक करण्यासाठी वापरत आहे.” हा व्हिडिओ समोर आल्यानंतर सरकारच्या कार्यशैलीवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

बातम्या आणखी आहेत...