आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शरद पवार विरुद्ध विवेक अग्निहोत्री:कश्मीर फाईल्सच्या विवेक अग्निहोत्रीचे शरद पवारांना प्रत्युत्तर, म्हणाला- ईश्वर तुम्हाला दीर्घायुष्य, सद्बुद्धी देवो!

नवी दिल्ली4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

देशात सध्या द काश्मीर फाईल या चित्रपटावरून वातावरण चांगलेच तापले आहे. चित्रपट बॉक्स ऑफीसवर तुफान कमाई करत आहे. यातच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हा चित्रपट पाहायला हवा असे सांगितले होते. यावर खासदार शरद पवार यांनी अक्षेप घेतला आहे. आणि या चित्रपट प्रदर्शित करण्यास परवानगी का दिली. ती देण्याची गरज नव्हती असे म्हणत पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला आहे.

काय म्हणाले होते शरद पवार
भाजप द काश्मीर फाईल चित्रपटाच्या माध्यमातून गैरप्रचार आणि गैरसमज निर्माण करत आहे. यामुळे संपूर्ण देशात विषारी वातावरण निर्माण होत आहे, असा आरोप शरद पवारांनी केला आहे. शालेय अभ्यासक्रमातूनच विद्यार्थ्यांच्या मनात विष पेरण्याचा प्रयत्न सुरू आहे, असा टोला भाजपला लगावला होता. देशात धार्मिक तेढ निर्माण करणाऱ्या शक्तींचा जोर वाढतोय अशी खोचक टीका शरद पवारांनी यावेळी केली होती.

पवारांनी चित्रपटाला आशीर्वाद दिले होते
शरद पवार आणि प्रतिभा पवार यांनी विमान प्रवासादरम्यान चित्रपटासाठी अभिनंदन केले होते. यावेळी पवारांनी चित्रपटाला आशीर्वाद देखील दिले होते. मात्र त्यांनतर शरद पवार यांचे वक्तव्य म्हणजे ढोगींपणा आहे, अशी जहरी टीका विवेक अग्निहोत्री यांनी केली आहे. या प्रवासादरम्यान मी पवारांच्या पाया पडलो, त्यावेळी दोघांनी मला व माझ्या पत्नी पल्लवी जोशीला शुभेच्छा दिल्या होत्या. मीडियासमोर पवारांना काय झाले माहिती नाही, पण त्यांचा उघड ढोंगीपणा दिसत असताना मी त्यांचा आदर करतो, असे विवेक अग्निहोत्री यांनी म्हटले आहे.

विवेक अग्निहोत्री उपहासात्मक टोला
विवेक अग्निहोत्री ट्विट करत म्हटले आहे की, शरद पवारजी, भारतासारख्या गरीब देशात तुमच्या मते एका राजकीय नेत्याने आपल्या बळावर कमावलेली किती कमाई, जास्तीत जास्त संपत्ती असली पाहिजे? भारतात इतकी गरीबी का आहे हे तुमच्यापेक्षा जास्त चांगले कोणाला माहिती असेल. देव तुम्हाल दिर्घायुष्य आणि सद्बुद्धी देवो. असा उपहासात्मक टोला शरद पवारांना लगावला आहे.

बातम्या आणखी आहेत...