आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Both Subjects Are Under The Jurisdiction Of The Police, Hence 'no Comment' On It; There Should Be An Absolute Inquiry Jayant Patil

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

प्रतिक्रिया:दोन्ही विषय पोलिसांच्या अखत्यारीत, त्यामुळे त्यावर 'नो कमेंट'; निरपेक्ष चौकशी व्हावी - जयंत पाटील

मुंबई3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • 'सध्या दोन्ही विषयात राजीनाम्याची आवश्यकता नाही'

सध्या राज्यात दोन विषयांची जोरदार चर्चा सुरू आहे. एक म्हणजे राष्ट्रवादीचे नेते आणि सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर करण्यात आलेले बलात्काराचे आरोप आणि दुसरे म्हणजे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांच्या जावयाला एनसीबीकडून झालेली अटक. यावर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.

प्रसार माध्यमांशी बोलताना पाटील म्हणाले की, दोन्ही विषयावर मी कमेंट करणार नाही. कारण, दोन्ही विषय पोलिसांकडे आहेत त्यामुळे आम्हाला पोलिसांवर दबाव आणायचा नाही. निरपेक्षपणे चौकशी व्हावी, असे मत पाटील यांनी माध्यमांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना मांडले.

मंत्री नवाब मलिक यांच्याबाबत जे चर्चिले जात आहे त्यामध्ये जावयाने केलेल्या घटनेला म्हणजे ती केली आहे की नाही हे चौकशीत कळेल परंतु सासर्‍यावर परिणाम होण्याची आवश्यकता नाही असेही जयंत पाटील यांनी स्पष्ट केले.

सध्या दोन्ही विषयात राजीनाम्याची आवश्यकता नाही. तशी परिस्थिती नाही. त्या परिस्थितीचा योग्य तो आढावा योग्य त्या स्तरावर घेण्यात येईल. मंत्रीमंडळात फेरबदल होण्याची आवश्यकता नसल्याचे जयंत पाटील यांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...