आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

क्राईम:नांदेडमधील हत्या प्रकरणातील दोन्ही आरोपी पंजाबमध्ये गोळीबारात ठार

तरनतारन/ नांदेडएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • ११ मार्चला झाली होती संतोखसिंग यांची तलवारीने भाेसकून हत्या

नांदेडमध्ये ११ मार्चला झालेल्या बाबा संतोखसिंग हत्या प्रकरणातील मुख्य दोन आरोपी रविवारी पोलिसांशी झालेल्या चकमकीत मारले गेले. पंजाब पोलिसांनी ही कारवाई केली. आरोपी गुरदेवसिंग आणि महताबसिंग तरनतारन जिल्ह्यात लपून बसले असल्याची माहिती मिळाल्यावर पोलिसांनी कारवाई केली. सिंहपुरा गावात आरोपींनी तलवारीने दोन पोलिस अधिकाऱ्यांवर वार केले. तरीही या अधिकाऱ्यांनी व पोलिस पथकाने कारवाई सुरूच ठेवली. बचावासाठी पोलिसांनी केलेल्या गोळीबारात दोन्ही आरोपी मारले गेले.

एक दिवस आधी परतले होते नांदेड पोलिस
नांदेड | जत्थेदार संत बाबा संतोखसिंग हत्याप्रकरणी गुरमितसिंग यांच्या तक्रारीनंतर नांदेडच्या वजिराबाद ठाण्याचे एक पथक पंजाबमध्ये दाखल झाले होते. पोलिसांनुसार, मृत संतोखसिंग यांच्या पाठीवर व मानेवार तलवारीने वार करण्यात आले होते. हे आरोपी पंजाबला परतले असल्याची माहिती मिळाल्यावर नांदेड पोलिस तरनतारनला पोहोचले. ही सर्व माहिती स्थानिक पोलिसांना देऊन नांदेड पोलिस शनिवारीच परतले होते. पंजाब पाेलिसांना यासंबंधी माहिती देऊन पथक परतल्याचे नांदेडचे पाेलिस अधीक्षक प्रमाेद शेवाळे यांनी पत्रकारांशी बाेलताना सांगितले.

बातम्या आणखी आहेत...