आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ब्रेक द चेन:जनतेच्या मनातील प्रश्नांची उत्तरे

9 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

प्र. घरकाम करणारे, वाहनचालक, स्वयंपाकी कामावर येऊ शकतात का? रेल्वे, बसेसने प्रवास करू शकतात का?उ. प्रत्येक शहरात संसर्गाची वेगवेगळी परिस्थिती आहे, त्यामुळे याबाबतीत स्थानिक प्रशासनाने योग्य तो निर्णय घ्यायचा आहे.

प्र. मूव्हर्स अँड पॅकर्सच्या मदतीने घरसामान हलवू शकतात का?उ. अपवादात्मक परिस्थितीत स्थानिक प्रशासन याला परवानगी देईल. मात्र सर्वसामान्यांसाठी याचे उत्तर नाही असेच आहे.

प्र. महाराष्ट्रांतर्गत खासगी वाहनाने प्रवास शक्य आहे का?उ. तुम्ही सार्वजनिक वाहनाचा उपयोग करून एका ठिकाणाहून/ स्थानकाहून दुसरीकडे जाऊ शकता.

प्र. वाइन शॉप्स आणि सिगारेट दुकाने उघडी असतील का?उ. नाही. केवळ आवश्यक गटातील दुकानेच उघडी राहू शकतील.

प्र. लोक सकाळी फिरायला जाणे, धावणे, सायकलिंग करू शकतात का?उ. नाही.

प्र. सिमेंट, रेडीमिक्स, स्टील हे बांधकाम साहित्य खुलेपणाने मिळणार का?उ. बांधकाम स्थळ सुरू ठेवण्यास परवानगी असेल तर बांधकाम साहित्य ने-आण करता येईल. साहित्याची ऑर्डर ऑनलाइन किंवा दूरध्वनीवरून देता येईल. मात्र, कुठलेही बांधकाम साहित्याचे दुकान उघडे ठेवता येणार नाही.

प्र. कुरियर सेवा सुरू राहील का?उ. फक्त आवश्यक कारणांसाठी कुरियर सेवा सुरू राहू शकेल.

प्र. प्राणी तसेच लोकांसाठी मदतीचे काम करणाऱ्या स्वयंसेवी संस्थांचे काय?उ. स्थानिक प्रशासनाच्या मान्यतेशिवाय त्यांना काम सुरू ठेवता येणार नाही.

प्र. वस्त्रोद्योग आणि कपडे उद्योग सुरू ठेवता येईल?उ. नाही.

प्र. आवश्यक ई-कॉमर्स म्हणजे नेमके काय?उ. किराणा , औषधी, अन्नपदार्थ इत्यादी ई-कॉमर्समार्फत वितरित केले जाऊ शकतात.

प्र. प्लम्बर, सुतार, वातानुकूलन, फ्रिज तंत्रज्ञ, पेस्ट कंट्रोल व इतर घरगुती सामानाची दुरुस्ती करणारे येऊ शकतात का?उ. पाणी आणि वीज सेवा देणाऱ्या व्यक्ती ये-जा करू शकतात. पेस्ट कंट्रोल, घर स्वच्छता, उपकरण दुरुस्ती खूप आवश्यक असले पाहिजे. त्याची तत्काळ निकड हवी.

प्र. डेंटिस्टचे दवाखाने सुरू राहतील का?उ. होय.

प्र. स्टेशनरी, पुस्तकांची दुकाने सुरू राहतील का?उ. नाही.

प्र. आवश्यक सेवा सुरू ठेवण्यासाठी साहाय्यभूत उद्योग सुरू राहू शकतील का?उ. आवश्यकसाठी आवश्यक ते आवश्यक हे तत्त्व आहे. तरीदेखील काही संभ्रम असल्यास उद्योग विभागाचा निर्णय अंतिम राहील.

प्र. कामाच्या ठिकाणाजवळ राहणारे कामगार आणि कर्मचारीच उद्योग-कंपनीत येऊ शकतात की इतर भागातून व गावातून कामाच्या ठिकाणी येणाऱ्यांनासुद्धा परवानगी आहे?उ. आवश्यक वस्तूंचे उत्पादन करणाऱ्या कारखान्यांना परवानगी आहे. तेथील कामगार व कर्मचारी ये-जा करू शकतात. इतर कारखाने व उद्योगांच्या बाबतीत ज्या कामाच्या ठिकाणी किंवा स्वतंत्रररत्या कामगारांची राहण्याची व्यवस्था केलेली असेल आणि तिथून त्यांच्या प्रवासाची स्वतंत्र व्यवस्था असेल ते उद्योग सुरू राहू शकतात.

प्र. आयातदार व निर्यातदार यांना परवानगी दिली आहे. मात्र, या निर्यातदारांना कामासाठी साहाय्यभूत ठरणाऱ्या वस्तू किंवा सेवा देणारे सुरू ठेवू शकतील का?उ. नाही. केवळ आवश्यक वस्तूंची आयात करणे अपेक्षित आहे. इतर आयात वस्तूंचा साठा करून ठेवावा लागेल. निर्यातीच्या बाबतीत अगोदरच तयार करून ठेवलेल्या वस्तूंची निर्यात करता येईल. निर्यात करणाऱ्या वस्तूंच्या उत्पादनाबाबत बोलायचे तर केवळ निर्यातीची जी पुरवठा ऑर्डर असेल त्या मर्यादेतच उत्पादन करता येईल. काही अडचण असल्यास उद्योग विभाग मार्गदर्शन करेल.

प्र. उत्पादन करणाऱ्या उद्योगांना परत परवानग्या घ्याव्या लागतील की पूर्वीच्या परवानग्या वैध असतील?उ. उद्योग सुरू राहण्यासाठी १३ एप्रिल २०२१ च्या आदेशाप्रमाणे पूर्तता करणे गरजेचे आहे.

प्र. आवश्यक वस्तूंचा पुरवठा दुकानांना करण्यासाठी रॅपिड अँटिजन चाचणी करावी लागेल का?उ. नाही.

प्र. काही आवश्यक वस्तू जसे की अन्नपदार्थ हे उपाहारगृहामार्फत किंवा ई-कॉमर्समार्फत रात्री ८ नंतर घरपोच वितरित करता येईल का?उ. आवश्यक सेवा आणि सुविधांवर तसेच घरगुती पुरवठा करण्यावर बंदी नाही. या सेवा पुरवणाऱ्या आस्थापनांच्या कामांना स्थानिक प्रशासनाने रात्री ८ नंतर काम करण्यास परवानगी दिली असेल तर घरी पुरवठा ( होम डिलिव्हरी) रात्री ८ नंतर करता येईल. स्थानिक प्रशासन वेळेमध्ये आवश्यकता भासल्यास लवचिकता ठेवू शकते.

प्र. रस्त्यावरील खाद्यविक्रेते सुरू ठेवू शकतील?उ. सकाळी ७ ते रात्री ८ या वेळेत पार्सल आणि घरगुती वितरणास मान्यता देण्यात आली आहे. ( या प्रकारात होम डिलिव्हरी फारशी होत नाही.)

प्र. खूप मोठ्या गृहनिर्माण संस्थेत संपूर्ण सोसायटी मायक्रो कंटेनमेंट जाहीर केली जाऊ शकते का?उ. सोसायटीच्या परिसरात ५ पेक्षा जास्त व्यक्ती कोविडग्रस्त आढळल्यास ते क्षेत्र मायक्रो कंटेनमेंट घोषित करावे लागेल. जर गृहनिर्माण संस्था खूप मोठी असेल तर स्थानिक प्रशासन याबाबतीत रुग्णांचे अंशतः: विलगीकरण क्षेत्र कारण्याबाबतीत नियोजन करू शकेल. कंटेनमेंट घोषित करण्यामागचा मूळ उद्देश या क्षेत्रात प्रवेश करणारे आणि बाहेर जाणाऱ्यांवर नियंत्रण आणणे आणि इतरत्र संसर्ग फैलावणार नाही यासाठी तो भाग अलग करणे होय. कंटेनमेंटसाठीच्या एसओपीचे तंतोतंत पालन केले जावे.

प्र. स्थानिक प्रशासन दुसऱ्या कोणत्या मुद्द्यांवर नव्याने आदेश निर्गमित करू शकेल?उ. स्थानिक प्रशासन अपवादात्मक म्हणून काही सेवन आवश्यक गटात अंतर्भूत करून परवानगी देऊ शकेल. मात्र यासाठी त्यांनी संपूर्ण विचारांती आणि अपवादात्मक परिस्थितीत हा निर्णय घ्यावयाचा आहे.

प्र. पेट्रोलियम उत्पादनांचा पुरवठा पेट्रोल पंप्स, एव्हिएशन स्टेशन्स, एलपीजी बॉटलिंग प्लँट हे आवश्यक सेवेत येतात का?उ.हो.

प्र. औषधी उत्पादनांची यंत्रसामग्री आणि उपकरणे यांच्या उद्योगांना मान्यता आहे का?उ.होय.

प्र. आवश्यक सेवा ही फक्त सकाळी ७ ते रात्री ८ या कालावधीतच सुरू राहील का?उ. आवश्यक सेवा आठवड्याचे २४ तास सुरू राहील. ( स्थानिक प्रशासनाने या गटातील सोडून काही इतर कायद्यान्वये वेळ ठरवून दिली असेल तर त्या वेळेत त्यांना सुरू ठेवता येईल.) मात्र आपत्ती व्यवस्थापन कायद्यात यासंदर्भात काही निर्बंध नाहीत.

प्र. सर्वसामान्य नागरिक लोकल प्रवास करू शकतील का?उ. होय. आदेशात दिलेल्या वैध कारणांसाठी सर्वसामान्य नागरिक लोकल रेल्वेचा उपयोग करू शकतील.

प्र. खासगी वाहने कर्मचाऱ्यांना घेऊन कार्यालयात किंवा कामाच्या ठिकाणी ये-जा करू शकतील?उ. त्यांची कार्यालये किंवा आस्थापना आवश्यक गटात असतील किंवा त्यांना निर्बंधांतून वगळले असेल तेच प्रवास करू शकतील.

प्र. बाहेरगावी जाणाऱ्या रेल्वेचे काय?उ.आवश्यक सेवा असल्याने त्या सुरूच राहतील आणि त्यातून कुणीही प्रवास करू शकेल.राज्यात कोरोनाची दुसरी लाट आली आहे. त्या पार्श्वभूमीवर सरकारने पुन्हा लॉकडाऊन लागू केला आहे. लॉकडाऊनबाबत लोकांच्या मनात काही प्रश्न आहेत. जाणून घेऊ त्यांची उत्तरे....

बातम्या आणखी आहेत...