आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मातृदिनी मानवंदना:वीरमातेला बीएसएफ जवानांनी केली 83 हजार रुपयांची मदत

हिंगोलीएका वर्षापूर्वीलेखक: प्रवीण पवार
  • कॉपी लिंक
  • 15 जवानांचे मातृदिनी असेही वंदन

मंगेश शेवाळकर 

औंढा तालुक्यातील पिंपळदरी येथील वीरमातेची लॉकडाऊमुळे हाेत असलेली हेळसांड पाहून १५ बीएसएफ जवानांनी मदतीचा हात पुढे केला आहे. त्यांच्या बँक खात्यावर आर्थिक मदत जमा करून मातृदिनी मानवंदना दिली आहे. पिंपळदरी येथील वीरमाता रुख्मिणबाई भालेराव यांचा एक मुलगा देशासाठी शहीद झाल्यानंतर दुसरा मुलगा सोबत घेऊन मजुरीची कामे करावी लागत आहेत. हे पाहून सामाजिक कार्यकर्ते बापूराव घोंगडे यांनी केलेल्या मदतीबाबत कळाल्यानंतर विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांच्या सूचनेवरून जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी, तहसीलदार पांडुरंग माचेवाड यांनी त्यांची भेट घेऊन मदत केली. शिवाय निराधार योजनेच्या अर्थसाहाय्याचे प्रस्ताव तयार केले. तर खासदार ॲड. राजीव सातव यांनी रुख्मिनबाई यांना चार एकर जमीन देण्याचे शासनाला पत्र दिले. तसेच आमदार संतोष बांगर यांनीही मदत केली.

मातृदिनी जवानांची मदत देऊन मानवंदना : बीएसएफचे अधिकारी राजन सूद, रितुलाल, अनुभव अत्रेय, दीपक ठाकूर, ग्यानेंद्रसिंग, धनंजय मिश्रा, अमित पंडित, सत्तार खान राजमताई, विकास कुंदू, संतोष थौदम, रिचपालसिंग कविया, विक्रम पुणिया, डी. पी. यादव, धीरेंद्र सेंगर, अविनाश शर्मा, स्वरन प्रशांत यांच्यासह परीक्षित राजन, नीरज वर्मा यांनी मदत जमवली. ८३ हजार रुपयांच्या मदतीची रक्कम वीरमाता रुख्मिनबाई भालेराव यांच्या बँक खात्यात जमा केली. तर इतर नागरिकांनीही मदत केली असून आता पर्यंत १ लाख ९ हजार रुपये त्यांच्या बँक खात्यात जमा झाले आहेत. या वीरमातेच्या आरोग्य सेवेची जबाबदारी हिंगोली येथील सह्याद्री हॉस्पिटलचे डॉ. यशवंत पवार यांनी घेतली आहे.

विभागीय आयुक्त कार्यालयाची मदत

: विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांच्यासह कार्यालयाने ५० हजार ५०० रुपयांची रक्कम वीरमाता रुख्मिनबाई भालेराव यांच्या बँक खात्यात जमा केली आहे. मंगळवारी सदर रक्कम जमा करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.

वीरमातेच्या मदतीसाठी सदैव तयार

बीएसएफमध्ये देशाची सेवा करताना सर्व जवान एकाच परिवारातील आहेत. त्यामुळे शहीद जवानांच्या पश्चात त्यांच्या कुटुंबीयांना मदत करणे जवानांचे कर्तव्य आहे. त्यानुसार वीरमातेच्या मदतीसाठी आम्ही सदैव तयार आहोत. - अनुभव अत्रेय, बीएसएफ कमांडो अधिकारी

‘दिव्य मराठी’मुळे माहिती

‘दिव्य मराठी’ने प्रसिद्ध केलेली बातमी श्रीरामपूर येथील बीएसएफ जवान सय्यद शफिक यांना पाहायला मिळाली. त्यांनी त्यांच्या आखाडा बाळापूर येथील मामाशी संपर्क साधत पिंपळदरीचे सामाजिक कार्यकर्ते घोंगडे यांच्याशी संपर्क साधला. वीरमाता रुख्मिणबाई यांची परिस्थिती जाणून घेऊन सर्व जवानांना याबाबत माहिती दिली.

बातम्या आणखी आहेत...