आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बस पुलावरुन कोसळली:परतूरमध्ये कसुरा पुलावरुन 23 प्रवाशांना घेऊन जाणारी एसटी बस पाण्यात कोसळली, गावकऱ्यांच्या प्रसंगावधानामुळे सर्व प्रवासी सुखरूप

आष्टी2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

परतुर तालुक्यातील श्रीष्टी येथील पाझर तलाव शंभर टक्के भरल्याने परतूर आष्टी रस्त्यावर असलेल्या कसुरा नदीच्या नदीला पूर आला आहे. पाणी पुलावरून वाहत असताना बसच्या चालकाला पाण्याचा अंदाज न आल्याने जालना-आष्टी बस पुलावरुन पाण्यात कोसळल्याची घटना गुरुवारी रात्री पावणे आठ वाजेच्या सुमारास घडली आहे. गावकऱ्यांनी प्रसंगावधान राखत वेळीच मदत केल्याने सर्व बसमधून प्रवास करणारे 23 प्रवाशी सुखरूप असल्याचे आगार प्रमुख दिगंबर जाधव यांनी सांगितले.

परतूर अगाराची आष्टी येथे मुक्कामी असलेली जालना आष्टी बस घेऊन चालक के. एम. गिरी व वाहक काळे हे गुरुवारी येत होते. मात्र श्रीष्टी येथील पाझर तलाव शंभर टक्के भरल्याने पाणी पुलावरून पाणी वाहत असल्याने दिवसभर वाहतूक ठप्प होती. रात्री पावणे आठ वाजेच्या सुमारास चालक आणि वाहक हे बस घेऊन त्या ठिकाणी आले. पुलावरून पाणी वाहत असताना चालकाने बस पाण्यातून काढण्याचा प्रयत्न केला. मात्र पुलावरून बस खाली पाण्यात कोसळली.

वेळीच प्रसंगावधान राखत गावकऱ्यांनी तात्काळ मदतकार्य करून सर्व प्रवाशांचे प्राण वाचवले. दरम्यान वाहकाची मशीन बंद पडल्याने या बसमधून किती प्रवाशी प्रवास करीत होते. हे सांगता येत नसून 23 प्रवाशी असल्याचे माहिती आतापर्यंत मिळाली आहे. मात्र सर्व सुरक्षित आहेत असे परतूर आगार प्रमुख दिगंबर जाधव यांनी सांगितले आहे.

घटनास्थळी एस. डी. एम भाऊसाहेब जाधव तहसीलदार रूपा चित्रक, आरोग्य विभागाचे डॉ. नवल आष्टी पोलिस ठाण्याचे सहाययक पोलिस निरीक्षक शिवाजी नागवे आदींनी घटणास्थळी भेट दिली आहे.

बातम्या आणखी आहेत...