आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मोठा अनर्थ टळला:प्रेशर पाईप तुटल्याने बसने घेतला पेट, तळोद्यातील धक्कादायक प्रकार

तळोदा16 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • या सर्व प्रकारामुळे प्रवासी मोठ्या प्रमाणात घाबरले होते

तळोद्याहून शहादाकडे जाणाऱ्या बसने अचानक पेट घेतल्याची घटना आज दुपारी पाऊने तीन वाजेच्या सुमारास तळोदा शहरातील हरकलाल नगर जवळीस पेट्रोल पंपासमोर घडली. वेळीच आग विझविण्यात आल्याने मोठा अनर्थ टळला.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, अक्कलकुवा आगारातून बस क्रमांक एम एच १४ बी टी १७२० ही तळोदामार्गे शहादा येथे जात होती. बुधवारी दुपारी अडीच ते पाऊने तीन वाजेच्या सुमारास ही बस तळोदा बसस्थानाकातून शहादाकडे जाण्यासाठी निघाली. अवघ्या अर्ध्या किलोमीटरपेक्षा कमी अंतरापर्यत ही बस गेली असता बसचा प्रेशर पाईप फुटला. त्यामुळे जोराचा आवाज झाला व बसच्या खालच्या बाजूने धूर निघू लागला. आवाज झाल्याचे लक्षात आल्यानंतर व बसमधून अचानक धूर निघू लागल्याचे लक्षात आल्याने चालकाने प्रसंगावधान दाखवून त्वरित बस थांबवली धूर निघणाऱ्या जागेतून बसने पेट घेतला. यावेळी बस मध्ये ३० ते ३५ प्रवासी होते. बसच्या खालून धूर व आग लागण्याचे पाहून

बस मधील प्रवाशांची मात्र चांगलीच घाबरगुंडी उडाली. आजूबाजूच्या लोकांनी धाव घेत बसमधून प्रवाशाना तात्काळ खाली उतरविण्यासाठी मदत केली. पेट्रोल पंपावरील अग्निशमन उपकरांणाने आग तात्काळ विझविण्यात आली. ही आग तात्काळ विझविण्यात आल्याने मोठा अनर्थ टळला.

या सर्व प्रकारामुळे प्रवासी मोठ्या प्रमाणात घाबरले होते. प्रवास्यामध्ये लहान मुले, जेष्ठ नागरिक, महिला, तरुणाचा समावेश होतो. बस आग लागल्याने पाहून बघ्यानी मोठ्या प्रमाणात गर्दी केली तर काहींनी मदतीसाठी धाव घेऊन प्रवास्यांना खिडकीतून बाहेर काढले तर काहींनी आग विझविण्यासाठी मदत केली. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.

सुरक्षित प्रवास समजल्या जाणाऱ्या राज्य परिवहन महामंडळाच्या बसेसना आवश्यक ते साहित्य पुरविण्यात येत नसल्याने चालकांना जीव धोक्यात घालून बसेस चालवाव्या लागत आहेत. शासनाने याकडे गंभीरतेने बघण्याची गरज असून एसटी महामंडळाला आवश्यक ते बस दुरुस्तीचे साहित्य उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी करण्यात येत आहे.

बातम्या आणखी आहेत...