आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मंदिरे उघडण्यावरुन अण्णा हजारे आक्रमक:दारुची दुकानं, हॉटेल्स सर्व काही खुलं होऊ शकतं, तर मंदिरे का नाही? अण्णा हजारेंचा ठाकरे सरकारला आंदोलनाचा इशारा

2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

राज्यातील मंदिरं उघडण्याबाबत अण्णा हजारे यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. मंदिरं न उघडल्यास आंदोलनाचा इशारा त्यांनी ठाकरे सरकारला दिला आहे. मंदिरं उघडण्यात सरकारला काय अडचण आहे? दारुची दुकानं, हॉटेल्स सर्व काही खुलं केलं. तिथल्या गर्दीतून कोरोना होत नाही का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.

"मंदिरं उघडण्यासाठी रस्त्यावर उतरा. मोठं आंदोलन उभारा. मी स्वत: त्यात सहभागी होईन. 10 दिवसात जर मंदिरं उडण्याचा निर्णय सरकाने न घेतल्यास जेल भोरो आंदोलन करा मी तुमच्या बरोबर असेन," असे अण्णा हजारे यांनी म्हटले आहे.

माझा विश्वास आहे की भरकटत चाललेल्या समाजाला फक्त मंदिरच तारु शकतात. त्यमुळे संतांचे विचार देणारी मंदिरं बंद का? संतांचे विचार सरकारला समजले नाहीत का?," असं म्हणत त्वरीत मंदिरं उघडण्याची मागणी त्यांनी सरकारकडे केली आहे.

दरम्यान, शनिवारी अहमदनगरच्या मंदिर बचाव कृती समितीने ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची राळेगणसिद्धी येथे भेट घेतली आणि राज्यातील बंद असलेली सर्व मंदिरं उघडण्यासाठी सरकारकडे पाठपुरावा करावा, अशी विनंती केली. या भेटीनंतर अण्णा हजारे यांनी मंदिरं उघडण्यासाठी आंदोलन करण्याचे आवाहन केले आहे.

बातम्या आणखी आहेत...