आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराईडब्ल्यूएस आरक्षण रद्द झाल्यामुळे मराठा समाजाला पुन्हा एकदा धक्का बसला. पहिले एसईबीसी प्रवर्गातील आरक्षण रद्द झाले. आता ईडब्ल्यूएस आरक्षणसुद्धा हायकोर्टाने रद्द केले आहे. त्यामुळे मराठा समाजात असंतोष पसरला. रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा मराठा संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे.
एसईबीसी आरक्षण रद्द झाल्यामुळे मराठा विद्यार्थ्यांना नोकरीत सामावून घेण्याचा प्रश्न निर्माण झाला होता. राज्य सरकारने ईडब्ल्यूएस आरक्षण लागू केले होते. मात्र, ३० मे २०२० रोजी राज्य सरकारला आम्ही नम्रपणे विनंती केली होती की, ईडब्ल्यूएस आरक्षण घेऊन उत्तीर्ण विद्यार्थी आणि मराठा आरक्षणातील पास झालेले विद्यार्थी यांचा एकमेकांशी संघर्ष होईल. त्याला आव्हान दिले जाईल. चुकीचा पर्याय राज्य सरकारने देऊ नये. परंतु तत्कालीन महाविकास आघाडी सरकारने दुर्दैवी निर्णय घेतला.
आज ईडब्ल्यूएस आरक्षण रद्द झाल्यामुळे विद्यार्थी पुन्हा एकदा नैराश्यात गेले आहेत. राज्य सरकारला विनंती आहे, कुठल्याही किचकट न्यायालयीन प्रक्रियेमध्ये वेळ न घालवता तत्काळ सुपरन्यूमरी पद्धत किंवा विशेष बाब पद्धत अवलंबून विद्यार्थ्यांना यामध्ये सामावून घ्यावे. तसेच विद्यार्थ्यांनी नाउमेद होऊ नये. कायदेशीर प्रक्रिया आपण पूर्ण करू. निश्चित न्याय मिळेल, असा विश्वास राज्यातील मराठा क्रांती मोर्चाचे मुख्य समन्वयक विनोद पाटील यांनी व्यक्त केला आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.