आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

वादग्रस्त विधान:इंदोरीकर महाराजांना ते'' वादग्रस्त वक्तव्य भोवलं, संगमनेरमध्ये महाराजांविरोधात गुन्हा दाखल

संगमनेर10 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • फेब्रुवारी महिन्यात मुला-मुलीच्या जन्माविषयी केले होते वक्तव्य

पुत्रप्राप्तीसाठी केलेल्या वक्तव्यावरुन अखेर निवृत्ती महाराज इंदोरीकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संगमनेर कोर्टात त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फेब्रुवारी महिन्यात इंदोरीकर महाराजांनी मुला-मुलीच्या जन्माविषयी वक्तव्य केल्याप्रकरणी सामाजिक कार्यकर्त्या रंजना गवांदे यांनी तक्रार केली होती. त्यानंतर जिल्हा आरोग्य प्रशासनाने संगमनेर कोर्टात गुन्हा दाखल केला होता. PCPNDT कायद्यानुसार हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

निवृत्ती महाराज इंदोरीकर यांच्या वक्तव्यावरुन राज्यभर वाद पेटला होता. इंदोरीकर महाराजांच्या वक्तव्यामुळे राज्यात विरोधक आणि समर्थक, असे दोन गट पडले होते. यादरम्यान, अनेक संघटनांनी त्यांच्या विरोधात भूमिका घेत आंदोलनेही केली होती. तर, त्यांच्या बाजूने देखील एक गट रस्त्यावर उतरला होता.

इंदोरीकर महाराज नेमकं काय बोलले होते?

'स्त्रीसंग सम तिथीला झाला तर मुलगा होतो, विषम तिथीला झाला तर मुलगी होते आणि स्त्री संग जर अशीव वेळेला झाला तर येणारी पीढी रांगडी, बेवडी आणि खानदान मातीत मिळवणारी होतात. जर टायमिंग हुकला की क्वॉलिटी खराब,' असे विधान इंदोरीकर महाराजांनी केले होते.

बातम्या आणखी आहेत...