आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मोठी बातमी:सीबीआयकडून माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या स्वीय सहाय्यकांना चौकशीसाठी समन्स

मुंबई2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • आज देशमुखांच्या स्वीय सहाय्यकांचे जबाब नोंदवले जाणार

मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांनी केलेल्या वसुलीच्या आरोपानंतर आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागणाऱ्या माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या अडचणीत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. या प्रकरणाचा तपास करणाऱ्या केंद्रीय अन्वेषण विभागा (CBI)ने अनिल देशमुख यांचे स्वीय सहाय्यक कुंदन आणि पालांडे यांना चौकशीसाठी समन्स पाठवले आहे. आज(दि.11) या दोघांचे जबाब नोंदवले जाणार आहेत.

मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सचिन वाझेंना दर महिन्याला 100 कोटी रुपयांचे टार्गेट दिल्याचा गंभीर आरोप केला होता. याप्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश सीबीआयला हायकोर्टाने दिले होते. सीबीआयकडून परमबीर सिंह आणि सचिन वाझेची चौकशी झाली. त्या चौकशीतून अनिल देशमुखांच्या स्वीय सहाय्यकांची नावे समोर आली.

बातम्या आणखी आहेत...