आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Celebrate Janmashtami At Home During Corona Period, While Dahihandi Celebrations Were Canceled Across The State Including Mumbai

दहहंडी उत्सव:कोरोना काळात जन्माष्टमी सोहळा घरीच करा साजरा, तर मुंबईसह राज्यभरातील दहीहंडी उत्सव करण्यात आला रद्द

मुंबईएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

राज्यभरात कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता सण उत्सवांवर निर्बंध घालण्यात आले आहे. आज कृष्णजन्माष्ठमी आहे. तसेच यानंतर मोठ्या धुमधडाक्यात राज्यभरात दहीहंडी उत्सव साजरा केला जातो. मुंबई-ठाण्यासह पुण्यात तर दहहंडी उत्सवाची धूम असते. मात्र कोरोनाच्या पाश्वभूमीवर दहीहंडी उत्सव रद्द करण्यात आला आहे. तर जन्माष्टमी सोहळा घरच्या घरी साजरा करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

ठाण्यात दहहंडी उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. मात्र याच ठाण्यात यंदा शुकशुकाट पाहायला मिळणार आहे. आयोजकांनी आरोग्य उत्सव साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. तर दुसरीकडे मनसेने देखील हा सण रद्द करून ठाण्याच्या मध्यवर्ती ठिकाणी नौपाडा येथील त्यांच्या कार्यालयात गोकुळ अष्टमीचा जन्म उत्सव पूजा अर्चाकरून साजरा करण्यात येणार आहे.

ठाण्यातील स्वामी प्रतिष्ठानची दहीहंडी रद्द, खर्च कोरोनाग्रस्त रुग्णांना
कोरोनामुळे दहहंडी उत्सव रद्द करण्यात आला आहे. ठाण्यातील अनेक गोविंदा पथकांनी उत्सव साजरा न करण्याचा निर्णय घेतला. ठाणे येथील खेवरा सर्कल येथे दरवर्षी मोठया धुमधडाक्यात दहीहंडी उत्सव साजरा करणाऱ्या भाजप पुरस्कृत स्वामी प्रतिष्ठानने देखील आपला दहीहंडी उत्सव रद्द करुन उत्सवासाठी होणारा सर्व खर्च कोरोनाग्रस्त रुग्णांना मदत म्हणुन देणार असल्याचे सांगितले आहे.

शर्डीत भक्तांशिवाय जन्माष्टमी सोहळा
देशभरात श्रीकृष्ण जन्माष्टमीचा उत्सव साजरा होत आहे. मात्र यंदाचा उत्सव अत्यंत साध्या पद्धतीने साजरा होतोय. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर घरच्याघरी जन्माष्टमी साजरी करायची आहे. तसेच मंदिरांमध्येही भक्तांना प्रवेश नाही. शिर्डीच्या साईबाबा मंदीरातही हा उत्सव मोठया श्रध्देने आणि उत्साहात साजरा करण्यात येतोय. मात्र यावेळी हा सोहळा भक्तांविना साजरा केला आहे. दर वर्ष येथे मोठ्या प्रमाणात भक्तांच्या उपस्थितीत हा सोहळा साजरा केला जात असतो.

बातम्या आणखी आहेत...