आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

औषध पुरवठा:केंद्र शासनाकडून राज्याला 14 लाख हायड्रोक्सीक्लोरोक्वीन तर 89 हजार अॅझीथ्रोमायसीन गोळ्यांचा पुरवठा

हिंगोलीएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी शासन व प्रशासनाकडून युध्दपातळीवर प्रयत्न सुरू

मंगेश शेवाळकर

राज्यात कोरोना विषाणूच्या पार्श्वभुमीवर केंद्र शासनाने राज्य शासनाला १४ लाख हायड्राेक्सीक्लोरोक्वीन तर ८९ हजार ॲझीथ्रोमायसीन गोळ्यांचा पुरवठा केला आहे. सदर औषधी ठाणे येथे आरोग्य उपसंचालक कार्यालयाच्या औषध भांडारामध्ये एकत्रीत करण्यात आली आहे. त्यानुसार आता प्रत्येक आरोग्य उपसंचालक कार्यालयाने त्यांच्या जिल्हयांसाठी मंजूर औषधीसाठा ताब्यात घेऊन वाटप करण्याच्या सुचना आरोग्य सेवा आयुक्त कार्यालय मुंबई यांनी दिल्या आहेत.

राज्यात कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी शासन व प्रशासनाकडून युध्दपातळीवर प्रयत्न केले जात आहेत. त्यासाठी विविध जिल्ह्यातील आवश्‍यक भाग सील केले जात आहेत. शासनाकडून खबरदारीच्या सर्व  प्रकारच्या उपाय योजना हाती घेतल्या जात आहेत. या शिवाय महसुल विभाग, आरोग्य विभाग, पोलिस विभाग एकत्रीतपणे काम करीत असल्याचे चित्र आहे.

दरम्यान, या परिस्थितीत रुग्णालयांमधून पुरेसा औषधीसाठा असावा तसेच संशयीतांचे स्वॅब नमुने घेतांना वैद्यकिय अधिकारी व आरोग्य कर्मचाऱ्यांना सुरक्षा किट दिल्या जात आहेत. सध्याची परिस्थिती लक्षात घेता रुग्णालयांकडून औषधीसाठा, एन ९५ मास्क, ट्रीपल लेयर मास्क तसेच ॲझीथ्रोमायसीनच्या गोळ्यांची मागणी नोंदविण्यात आली आहे. त्यानुसार राज्य शासनाने केंद्र शासनाकडे मागणी केल्यानुसार केंद्राने औषधींचा पुरवठा नुकताच केला आहे.

यामध्ये राज्यासाठी १४ लाख हायड्रोक्सीक्लोरोक्वीन, २८ हजार ४०० एन ९५ मास्क, ८ लाख ट्रीपल लेअर मास्क, ८९ हजार २०० ॲझीथ्रोमायसीन गोळ्या उपलब्ध करण्यात आल्या आहेत. सदर औषधीसाठी ठाणे येथील उपसंचालक कार्यालयाच्या औषधी भांडारामध्ये ठेवण्यात आला असून राज्यातील उपसंचालक कार्यालयाने तातडीने वाहने पाठवून औषधीसाठा घेऊन जाण्याच्या सुचना आरोग्य सेवा आयुक्तालय मुंबई यांनी दिल्या आहेत. उपसंचालक कार्यालयाने सदर औषधींचे वाटप करतांना सर्व आरोग्य संस्थांकडील शिल्लक आैषधीसाठा, प्रत्यक्ष मागणी, केसेस आदी गरज बघून तसेच विभागीय आयुक्तांच्या मान्यतेने वाटप करण्याच्या सुचनाही देण्यात आल्या आहेत.

राज्यातील आरोग्य उपसंचालक मंडळ व मिळालेला औषधीसाठा

आरोग्य उपसंचालक मुंबई मंडळ ठाणे ः १.५० लाख हायड्रोक्सी क्लोरोक्वीन, ६ हजार एन ९५ मास्क, २ लाख ट्रीपल लेयर मास्क, १५ हजार २०० ॲझीथ्राेमायसीन गोळ्यांचा समावेश आहे.

नाशिक ः १.५० लाख हायड्रोक्सीक्लोरोक्वीन, ३ हजार एन ९५ मास्क, ८० हजार ट्रीपल लेयर मास्क, १० हजार ॲझीथ्राेमायसीन गोळ्यांचा समावेश आहे.

पुणे ः  ३ लाख हायड्रोक्सीक्लोरोक्वीन, ६ हजार एन ९५ मास्क, २ लाख ट्रीपल लेयर मास्क, २० हजार ॲझीथ्राेमायसीन गोळ्यांचा समावेश आहे.

औरंगाबाद  ः  ३  लाख हायड्रोक्सीक्लोरोक्वीन, ४ हजार ५०० एन ९५ मास्क, १ लाख ट्रीपल लेयर मास्क, २० हजार ॲझीथ्राेमायसीन गोळ्यांचा समावेश आहे.

अकोला ः १.५० लाख हायड्रोक्सी क्लोरोक्वीन, ३ हजार एन ९५ मास्क, ८० हजार ट्रीपल लेयर मास्क, १० हजार  ॲझीथ्राेमायसीन गोळ्यांचा समावेश आहे.

नागपूर ः १.५० लाख हायड्रोक्सी क्लोरोक्वीन, ४ हजार ४०० एन ९५ मास्क, ९० हजार ट्रीपल लेयर मास्क, १० हजार ॲझीथ्राेमायसीन गोळ्यांचा समावेश आहे.

जेजे ग्रुप हॉस्पीटल मुंबई ः १५०० एन ९५ मास्क, ५० हजार ट्रीपल लेअर मास्क, ४ हजार ॲझीथ्रोमायसीन गोळ्यांचा समावेश आहे. तसेच बृहन्मुंबई महानगर पालिका ः २ लाख हायड्रोक्सीक्लोरोक्वीन गोळ्यांचा समावेश आहे.

सोमवारपर्यंत औषधी वाटपाचा प्रयत्न ः डॉ. स्वप्नील लाळे, आरोग्य उपसंचालक आैरंगाबाद

शासनाकडून औरंगाबाद आरोग्य उपसंचालक कार्यालयांतर्गंत आरोग्य संस्थेसाठी औषधी पुरवठा झाला आहे. साेमवारपर्यंत (ता.२०) औषधीसाठी आरोग्य संस्थेकडे पुरवठा करण्याचे प्रयत्न आहेत. त्याबाबत नियोजन केले आहे.

बातम्या आणखी आहेत...