आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खैरेंना म्हणावं 'आधी तुम्ही सुधरा':गुलाबराव पाटलांचा संताप, पुढे म्हणाले- 'इस देशमे रहना होगा तो वंदे मातरम कहना होगा'

2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

चंद्रकांत खैरेंनी शिंदे गटातील आमदारांवर केलेल्या वक्तव्यावर पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटलांनी चांगलेच प्रत्युत्तर दिले आहे. खैरेंना एमआयएम पक्षाने औरंगाबाद जिल्ह्यात धूळ चारली. खैरेंना म्हणावं 'पहिले तुम्ही सुधरा' मग लोकांच पाहा, असा टोला त्यांनी लगावला. तसेच 'इस देशमे रहना होगा तो वंदे मातरम कहना होगा' म्हणत वंदे मातरमविषयीदेखील आपले मत त्यांनी व्यक्त केले.

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त आजपासून राज्यभरातील सरकारी कार्यालयांमध्ये 'हॅलो ऐवजी वंदे मातरम' या अभियानाला सुरुवात होणार आहे. अभियानानुसार, शासकीय कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना आता फोन, मोबाईलवर तसेच बैठकीत संवाद साधताना 'हॅलो' ऐवजी 'वंदे मातरम' म्हणावे लागणार आहे.

त्यात वाईट काय?

याच वंदे मातरम अभियानाविषयी बोलताना गुलाबराव पाटील म्हणाले की, वंदे मातरम म्हणणे काय वाईट आहे. ज्या मातीत तुम्ही राहता त्या मातीला नमन करणे, म्हणजेच वंदे मातरम. 'इस देशमे रहना होगा तो वंदे मातरम कहना होगा'. एकप्रकारे असा इशाराच त्यांनी यावेळी दिला. तसेच पुढे त्यात वाईट काय. वंदे मातरम म्हणणे काही चुकीचे आहे का? असा सवालही गुलाबराव पाटलांनी उपस्थित केला.

काय म्हणाले होते खैरे?

शिंदे गटातील पन्नासच्या पन्नास आमदार निवडणूकीत पडतील, असे वक्तव्य शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी केले होते. तसेच जर हे सर्व आमदार पडले नाहीत तर मी हिमालयात जाईन, असेही ते म्हणाले होते. त्याचवेळी बीकेसी मैदानात होणाऱ्या दसरा मेळाव्यासाठी शिंदे गटाकडून 52 कोटी रुपये खर्च करण्यात येत आहेत, असा दावाही चंद्रकांत खैरे यांनी केला आहे.

गुलाबराव पाटलांचे उत्तर

मंत्री गुलाबराव पाटील यांनी चंद्रकांत खैरेंच्या वक्तव्याचा खरपूस समाचार घेतला आहे. ते म्हणाले, चंद्रकांत खैरे स्वतः आधी निवडून आलेले नाहीत. एमआयएमने त्यांच्या स्वतःच्या बालेकिल्ल्यात त्यांना पाडून टाकले. त्यांना म्हणावं, पहिले तुम्ही सुधरा बाबा, लोकांचं काय पाहता? असा टोलाही त्यांनी लगावला.

बातम्या आणखी आहेत...