आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

टीकास्त्र:खुर्चीसाठी बाळासाहेबानी दिलेली हिंदुत्वाची शिकवण तुम्ही विसरलात; चंद्रकांत पाटलांची मुख्यमंत्र्यांवर टीका

मुंबईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

शिवसेनेच्या दसऱ्या मेळाव्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपवर जोरदार टीका केली होती. या टीकेला आता भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी फेसबुकवरुन सडेतोड प्रत्युत्तर दिले आहे. 'खुर्चीसाठी बाळासाहेबांनी दिलेल्या हिंदुत्वाच्या शिकवणीचे पालन करणे तुम्ही विसरला आहात', अशा शब्दात चंद्रकांत पाटलांनी टीका केली.

चंद्रकांत पाटील यांनी फेसबुक पोस्टद्वारे म्हटले की, 'काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात देशाच्या सर्वोच्चपदी असणाऱ्या लोकांबद्दल अगदी अर्वाच्य भाषेचा उपयोग केला. तुम्ही राज्यप्रमुख आहात, याचा कदाचित तुम्हाला विसर पडला असल्याची प्रचिती काल आली. तुम्ही काल भाषणात पुन्हा एकदा तुमच्या तथाकथित हिंदुत्वाच्या नावाने गाजावाजा केला. मात्र, सत्तेच्या लालसेपोटी सोयीनुसार तुम्ही हिंदुत्वाची व्याख्या बदलत आहात, हे प्रकर्षणाने जाणवत आहे.'

'ज्यांच्या स्मारकाठिकाणी तुमचा कालचा कार्यक्रम चालला होता, त्या स्वातंत्र्यवीर सावरकरांचे हिंदुत्वदेखील तुमच्या पचनी पडले नाही. संरसंघचालक मोहन भागवत यांच्याच मार्गाने आम्ही चालत आहोत. सरसंघचालकांनी कालच्या भाषणात एक वक्तव्य केले की, हिंदू, हिंदुत्व, हिंदुराष्ट्र इसको लेकर भ्रम पैदा करने वाले लोग है, हे मुळात तुमच्यासाठी होते. हिंदुत्वाचा वापर करुन आपली खुर्ची शाबूत ठेवण्यासाठी तुमचा हा सगळा आटापिटा सुरू आहे. तुमच्याकडून आम्हाला हिंदुत्व शिकून घेण्याची गरज नाही. कारण तुमचं हिंदुत्व सोयीप्रमाणे बदलत.'

'मी कुटुंबप्रमुख आहे, असे काल तुम्ही म्हणालात. याशिवाय काही दिवसांपूर्वी अतिवृष्टी दौऱ्यावेळी हे शेतकऱ्यांचे सरकार आहे, असे वक्तव्य तुम्ही केले होते. मग जे कुटुंब बळीराजाच्या जीवावर चालतं त्यांच्यावर एकही शब्द न बोलता काल जाणीवपूर्वक शेतकऱ्यांच्या सद्यपरिस्थितीचा उल्लेख करणे टाळले. राज्यातील कोरोनाच्या परिस्थितीवरही चिडीचूप बसलात. केवळ आपलेच ढोल बडविण्यात तुम्ही समाधान मानले. एकंदरीत कालचे मुख्यमंत्र्यांचे भाषण हे अभ्यासशून्य आणि सूड भावनेने प्रेरित होते. तुम्ही राज्याचे मुख्यमंत्री आहात, 11 कोटींचे कुटुंब तुम्हाला सांभाळायचे आहे. केवळ भाषणबाजी करुन काहीही होणार नाही', असा जोरदार टोला चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना लगावला.