आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

टीकास्त्र:चंद्रकांत पाटील म्हणजे नरेंद्र मोदी लाटेत लॉटरी लागलेला माणूस, अजित पवारांची जहरी टीका

पंढरपूर9 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • त्यांनी एखादी 'टरबूज खरबूज' सोसायटीही काढली नाही

पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीसाठी दोन्ही पक्ष जोरदार प्रचार करताना दिसत आहेत. अनेक नेत्यांच्या पंढरपुरात प्रचारसभा होत आहेत. अशाच एका सभेत राष्ट्रवादीचे नेते आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री अजित पवार यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यावर जोरदार निशणा साधला. 'चंद्रकांत पाटील मोदी लाटेत लॉटरी लागलेला माणूस आहे, अशी टीका त्यांनी केली.

बुधवारी पंढरपूरातील प्रचारसभेत बोलताना अजित पवार म्हणाले की, चंद्रकांत पाटलांनी कधीच कुठली संस्था काढली नाही, कुठलीही बँक किंवा कारखाना चालवलेला नाही, कुठलीही विकास सोसायटी किंवा मजूर सोसायटी चालवलेली नाही. एवढच काय, तर एखादी टरबूज-खरबुज सोसायटीदेखील चालवली नाही. त्यांना ग्रामीण भागाच्या प्रश्नांशी काहीच देणघेणं नाही. फक्त नरेंद्र मोदींच्या नावावर निवडणूक आलेला माणूस आहे, अशी जहरी टीका त्यांनी यावेळी केली.

बातम्या आणखी आहेत...